bakari eid  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अपेक्षित रक्कम न मिळाल्याने विक्री बाजारातून बोकड माघारी; उलाढाल मंदावली

Dhule : मुस्लीमधर्मियांचा ईद सण सहा दिवसांवर आला तरी बाजारात बोकडांची अपेक्षित प्रमाणात खरेदी-विक्री झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मुस्लीमधर्मियांचा ईद सण सहा दिवसांवर आला तरी बाजारात बोकडांची अपेक्षित प्रमाणात खरेदी-विक्री झालेली नाही. धुळे बाजार समितीच्या आवारात मंगळवारी आठवडे बाजार असूनही बोकड्यांची खरेदी-विक्री झाली नाही. बाजारात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बोकडांची किंमत ११ हजारांपासून ५० हजारापर्यंत होती. अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने अनेकांनी बोकड माघारी नेणे पसंत केले. ( Buck withdraws from sale market after not getting expected amount )

शहराची लोकसंख्या पाच लाखावर आहे. त्यात सुमारे २० टक्क्यांवर मुस्लीमधर्मिय आहेत. मुस्लीम धर्मियांसाठी बकरी ईद हा सण महत्त्वाचा असतो. बोकडबळी देऊन ईदनिमित्त मुस्लीमबांधव पुण्याचा संचय करतात. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत मंगळवारी भरविण्यात आलेल्या आठवडा बाजारात अनेकांनी बोकड विक्रीस आणले होते. परंतु, खरेदीदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. विविध वैशिष्टये असलेल्या बोकडांची किंमत ११ हजारापासून ५० हजारापर्यंत होती. (latest marathi news)

उलाढाल मंदावली

स्थानिक शेतकऱ्यांबरोबरच बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बोकड विक्रीस आणले होते. अपेक्षित किंमत मिळत नसल्याने बोकड परत नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर भरविण्यात आलेल्या आठवडे बाजारात लाखोंची उलाढाल होईल, असा अंदाज होता. तो फोल ठरला आहे.

त्यास वाढलेली महागाई हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले. शिवाय शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असताना बकरी ईद सण आला. मुलांसाठी शैक्षणिक खर्च करावा लागल्याने अनेकांनी बोकड बळी देण्यासाठी बाजारात बोकडांची खरेदी केली नाही, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT