Chana Dal esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हरभरा डाळ दरवाढीचा ग्राहकांना झटका! बाजारात यंदा 15 ते 20 रुपयांनी महाग; सामान्यांची दिवाळी होणार तिखट

Latest Dhule News : त्यामुळे ग्राहकांना चांगलाच झटका बसत आहे. त्यामुळे यंदा सामान्यांसाठी दिवाळी काहीशी तिखटच होणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दोन आठवड्यानंतर दिवाळीसाठी घरोघरी लाडू करण्यासाठी वापरली जाणारी हरभरा डाळ यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलोमागे तब्बल १५ ते २० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच झटका बसत आहे. त्यामुळे यंदा सामान्यांसाठी दिवाळी काहीशी तिखटच होणार असल्याचे चित्र आहे. (chana dal price hike hits customers)

खाद्यतेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्यांना घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, मसूर डाळ आणि उडीद डाळीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. तूरडाळीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. परंतु, मूगडाळीचे दर स्थिर आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारात हरभरा डाळीचे दर प्रतिक्विंटलला साडेसात सात हजार ते ७ हजार ६०० रुपये इतके होते. ते सद्यःस्थितीत सरासरी नऊ हजार २०० ते नऊ हजार ४०० रुपये आहेत. किरकोळ बाजारात सरासरी ९५ ते १०० रुपये प्रति किलो हरभरा डाळीचे दर आहेत.

डाळीचा साठा नाही

यंदा हरभरा डाळीचा साठा नाही. त्यामुळे मालाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत आवकही कमी होत आहे. आगामी काळात काही प्रमाणात भाव घटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अन्य सर्व प्रकारच्या डाळींचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास स्थिरच आहेत. (latest marathi news)

निरनिराळ्या डाळींचे दर (क्विंटलमध्ये)

* डाळ प्रकार..........सप्टेंबर २०२३............सप्टेंबर २०२४

* हरभरा................७५००-७६००............९२००-९४००

* तूर....................१५,०००-१७,०००.........१५,०००-१६,२००

* मूग....................१०,६००-१०,८००.........१०,६००-१०,८००

* उडीद..................११,०००-१२,५००.........११,०००-११,५००

* मसूर...................७८००-७९००.............७३००-७४००

"दिवाळीत हरभरा डाळीस मोठी प्रमाणात मागणी असते. नवरात्रोत्सवादरम्यान दिवाळीसाठी खरेदी सुरू होते. त्यामुळे मागणी वाढती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा डाळ प्रति किलोमागे १५ ते २० रुपयांनी महागली आहे. दिवाळीपर्यंत दर तेजीतच राहतील, असा अंदाज आहे." - सुधाकर रोकडे, व्यापारी, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT