The winning MP of Congress in the Lok Sabha elections Dr. Election Returning Officer and Collector Abhinav Goyal giving certificate to Shobha Bachhao on Tuesday. Neighbor MLA Kunal Patil, District President Shyam Saner. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : चिवट लढतीत बच्छाव विजयी; भाजपच्या डॉ. भामरेंची हॅटट्रिक हुकली

Lok Sabha Constituency : डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चिवट आणि उत्कंठावर्धक निवडणूक झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चिवट आणि उत्कंठावर्धक निवडणूक झाली. तीत नाट्यमय घडामोडींनंतर डॉ. बच्छाव यांनी तीन हजार ८३१ मतांनी विजय मिळवत डॉ. भामरे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅटट्रिक हुकली. ( Congress Maha Vikas Aghadi candidate and exciting election was held between Shobha Bachhao )

तसेच स्वातंत्र्यानंतर ४७ वर्षे या मतदारसंघावर प्रभुत्व गाजविणाऱ्या काँग्रेसने बहुप्रतीक्षेनंतर विजय मिळविला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी नगावबारी परिसरातील शासकीय गुदामात मंगळवारी (ता. ४) सकाळी आठला मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात झाली. नाट्यमय घडामोडींमुळे रात्री सव्वाअकरापर्यंत मतमोजणीसह पुनःमोजणीची प्रक्रिया सुरू होती. ती आटोपताच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी डॉ. बच्छाव यांना विजयी घोषित केले.

मतमोजणीवेळी नाट्य

मतमोजणीत पहिल्या फेरीपासून दहाव्या फेरीपर्यंत डॉ. भामरे आघाडीवर होते. मात्र, अकराव्या फेरीपासून डॉ. बच्छाव यांनी घेतलेली आघाडी २१ व्या फेरीपर्यंत कायम होती. यात १८ व १९ व्या फेरीवेळी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील फागणे, कुसुंबा येथील दोन मतदान यंत्रांवरील आकडे दिसत नव्हते. त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठयांची मोजणी झाली.

अशा २० व २१ व्या फेरीत डॉ. बच्छाव आघाडीवर राहिल्या. यानंतर उमेदवार डॉ. भामरे यांनी पुनःमतमोजणीसाठी गोयल यांना अर्ज दिला. त्यानुसार प्रक्रिया पार पाडल्यावर रात्री सव्वाअकराला गोयल यांनी डॉ. बच्छाव यांना रीतसर विजयी घोषित केले. त्यामुळे मतमोजणीसंबंधी नाट्यावर पडदा पडला. (latest marathi news)

चिवट, चुरशीचा सामना

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, असा चिवट आणि चुरशीचा सामना झाला. यात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांना पाच लाख ८३ हजार ८६६ मते मिळाली; तर भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांच्या पारड्यात पाच लाख ८० हजार ३५ मते पडली.

काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यांच्याकडे विजयश्री खेचून आणण्यात वरिष्ठ नेत्यांसह धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. डॉ. भामरे यांची हॅटट्रिक रोखण्यात महाविकास आघाडीला यश आल्याने डॉ. बच्छाव समर्थक-कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.

धुळे मतदारसंघात २००९ नंतर तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने विजय प्राप्त केला. मतांची आघाडी कधी महाविकास आघाडीकडे, तर कधी भाजप महायुतीकडे झुकत असल्याने ही निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक ठरली. या स्थितीमुळे मतदान केंद्राबाहेर आघाडी मिळाल्यावर त्या-त्या पक्षाचे समर्थक जल्लोष करताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT