Mallikarjun Kharge greeting the attendees at the Congress-Mahavikas Aghadi meeting. Neighbor Dr. Shobha Bachhao, Atul Sonawane. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसचा हात, बदलेल ‘हालात'! महाविकास आघाडीचा प्रचार

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसने प्रथमच महिलेला उमेदवारी देत मतदारांचे लक्ष वेधले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेसने प्रथमच महिलेला उमेदवारी देत मतदारांचे लक्ष वेधले. यात राष्ट्रीय नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे राज्य, देशहिताचे धोरण आणि मतदारसंघातील सर्वांगिण विकासाच्या अजेंड्यावर भर देत काँग्रेस- महाविकास आघाडीने प्रचारात रंगत आणली. (Congress Mahavikas Aghadi campaign by emphasizing on agenda of overall development in constituency)

जातीय समीकरणांच्या पाठबळावर आणि काँग्रेसचा हात, बदलेल `हालात` या घोषणेतून नेते, उमेदवार प्रचारात गुंतल्याचे दिसले. धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचार शनिवारी (ता. १८) सायंकाळी पाचला समाप्त होत असून वीस मेस मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या काही तास अगोदर काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी घोषीत केली.

प्रतिस्पर्ध्याप्रमाणे काँग्रेस महाविकास आघाडीनेही महिलेच्या रूपाने मराठा- पाटील समाजाचा चेहरा दिला. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचा उमेदवार राहणार असल्याने मुस्लिम व इतर समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होईल, त्यामुळे प्रचारात अधिक कष्ट उपसावे लागतील याची काँग्रेस- महाविकास आघाडीला कल्पना आलेली होती.

हायसे जातीय समीकरण

निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अर्ज छाननीवेळी रिंगणातून बाद झाला आणि एमआयएम पक्षाने मतांचे ध्रुवीकरण टाळून काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीतील जातीय समीकरणेच बदलली. मुस्लीम, दलित आणि आदिवासी समाजाची पारंपरिक मते अधिकाधिक संख्येने पारड्यात येणार असल्याचे मानून काँग्रेसने प्रचाराला वेग दिला. (latest political news)

त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार इम्रान प्रतापगढी आदी स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी या गोंदूर विमानतळावरून नंदुरबार येथील सभेला गेल्या.

त्यांनी विमानतळावर स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करत उमेदवार डॉ. बच्छाव यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची धोरणे हा प्रमुख टिकेचा मुद्दा राहिला. त्यांच्या दहा वर्षांतील कार्यशैलीसह धोरणे आघाडीच्या प्रचार सभांत टिका- आरोपांच्या फैरीत दिसले.

प्रचारातील विविध मुद्दे

काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचारात मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे, कांदा निर्यातबंदीचा प्रश्‍न, वेगवेगळ्या वादातून देशासह राज्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होणे, महागाईमुळे त्रस्त झालेली जनता, महिलांवर वाढते अत्याचार, पिण्याचे पाणी, सिंचन, रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिकीकरणाला चालना न देणे, देशातील बड्या उद्योगपतींचे हित साधणे, संविधान बदलण्यासाठी अब की बार, चारसो पार, अशी घोषणा देणे, मणिपूरमधील अत्याचाराचा प्रश्‍न गांभीर्याने न हाताळणे, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देणार, दरवर्षी २ कोटी नोकरी देणार.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी दिलेली आश्वासने मोदींनी पूर्ण न करणे, ईडी- सीबीआय यंत्रणांचा गैरवापर करणे, तर उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी मतदाराच्या सर्वांगिण विकासासह शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणे, कांदा निर्यात बंदी उठविणे, तरूणांच्या हाताला काम मिळवून देणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे कठोर करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिकीकरणाला चालना, शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना, सिंचनासह पाणीप्रश्‍न सोडविण्यावर भर देणार असल्याचे प्रचारातून सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT