Employees of Sendhwa police station counting ganja. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बिजासन घाटात 54 किलो गांजासह शिरपूरच्या तिघांना अटक

Dhule Crime : महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गांजाची तस्करी करणारी कार जप्त करून सेंधवा (जि. बडवानी, मध्य प्रदेश) पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गांजाची तस्करी करणारी कार जप्त करून सेंधवा (जि. बडवानी, मध्य प्रदेश) पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. १० एप्रिलला महामार्गावर बिजासन (ता. सेंधवा) येथे केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, सर्व संशयित शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. (Dhule Crime 3 people from Shirpur arrested with 54 kg ganja in Bijasan Ghat)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडवानी जिल्ह्यात आंतरराज्यीय नाक्यांवर ऑपरेशन प्रहारअंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोद यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांची बिजासन येथे तपासणी सुरू झाली.

मारुती इको कार (एमपी ०९, डीडी ३३३८) अडवून झडती घेतली असता डिकी व कारमधून तीन प्लॅस्टिक गोण्यांमध्ये भरलेला गांजा आढळला. त्याचे वजन ५४ किलो असून, किंमत दहा लाख ४० हजार रुपये आहे. कारसह एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. (latest marathi news)

तिघांना अटक

गांजा तस्करी करताना आढळलेले कारमधील संशयित भय्यासिंह कलसिंह डावर (पावरा, वय २८), संदीप सीताराम डुडवे (१९, दोघे रा. निलगिरी पाडा, पळासनेर, ता. शिरपूर) व दिनेश दशरथ कनोजे (३४, रा. हिगाव, ता. शिरपूर) यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोद, अपर अधीक्षक अनिलकुमार पाटीदार.

डीवायएसपी कमलसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सेंधवा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीपकुमार पुरी, उपनिरीक्षक अशोक अहिरवार, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पांडे, हवालदार विनोद मिणा, समरथ राठोड, दिलीप कनोज, अल्केश यांनी ही कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT