Fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : गोट फार्म मालकांना 33 लाखांचा गंडा! सुमारे 780 बोकडांसह परप्रांतीय व्यापारी फरार

Crime News : शिरपूर तालुका परिसरातील ग्रामीण भागातून गेल्या वीस वर्षांपासून बकरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते.

सकाळ वृत्तसेवा

वकवाड : बोराडी गोट फार्म मालकांचे लाखो रुपये किमतीचे बोकड घेऊन व्यापाऱ्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात दिनेशकुमार राजाराम खाटीक (वय ५०) व त्याची मुले करण व अर्जुन खाटीक (रा. बबरपूर, जि. काल्पी, उत्तर प्रदेश, ह. मु. आमोदे ता. शिरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Dhule Crime 33 lakhs to Goat Farm owners frauded)

शिरपूर तालुका परिसरातील ग्रामीण भागातून गेल्या वीस वर्षांपासून बकरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते राज्यस्थान येथून बकऱ्याची लहान पिले आणून ते गोट फार्म चालकांना मोठे करण्यासाठी देत होते. मागील पाच वर्षांपासून बोराडी येथील समाधान प्रकाश पवार हे त्यांच्याशी व्यवहार करीत.

यानुसार बकरी ईदच्या अनुषंगाने पवार यांच्या बोराडी येथील गोट फार्ममध्ये पालनपोषण करून मोठे केलेले बोकड ते खाटीक यांना विकायचे. यंदा बकरी ईदच्या अनुषंगाने (ता.१४) जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास दिनेशकुमार खाटीक, अर्जुन दिनेशकुमार खाटीक, करण दिनेशकुमार खाटीक व सोबत अजून एक अज्ञात असे पवार यांच्या बोराडी येथील गोट फॉर्म येथे येऊन वीस हजार रुपये प्रति बोकड प्रमाणे अंदाजे १६५ बोकड अंदाजे एकूण ३३ लाख रुपये किमतीचे घेऊन गेले. (latest marathi news)

नेहमीप्रमाणे बकरी ईद झाल्यावर दोन-तीन दिवसांत बोकडचे पैसे देतो सांगून गेले. पवार यांनी खाटीक यास (ता. १९) रोजी बोकडचे पैसे मागण्यासाठी मोबाईलवर कॉल केला असता त्याचा मोबाईल बंद येते होता. त्यानंतर पवार यांच्या सोबत इतर गोट फार्मचे मालक त्यांचे साई गोट फॉर्म (आमोदे शिवार) व ते राहत असलेल्या आमोदे गावी गेले.

मात्र घरही बंद होते. पवार यांच्यासोबत आजूबाजूच्या खेड्यातून खाटीक यांनी जवळपास १७२ लोकांकडून सुमारे ७८० बोकड घेऊन गायब झाला आहे. यामुळे खाटीक यांनी फसवणूक केल्याने पवार यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT