Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: पोहता येत असल्याने चोवीस तास काढले विहिरीच्या पाण्यात! लोणखेडीत शेतकऱ्याने धीरोदात्तपणे केला प्रसंगाशी सामना

Dhule News : धीरोदात्तपणे प्रसंगाशी सामना करत चोवीस तास विहिरीतील पाण्यात काढले. ही घटना ९ जूनला दुपारी घडली. या प्रकरणी संशयितावर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शेतविहिरीतील पाणीपातळी बघण्याच्या बहाण्याने सोबत नेले. पातळी पाहताना मागून लाथ मारून विहिरीत पाडत एकाने शेतकऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोहता येत असल्याने शेतकरी बचावला. त्याने धीरोदात्तपणे प्रसंगाशी सामना करत चोवीस तास विहिरीतील पाण्यात काढले. ही घटना ९ जूनला दुपारी घडली. या प्रकरणी संशयितावर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Dhule Being able to swim 24 hours in well water farmer survived)

या प्रकरणी शालिग्राम भीमराव पाटील (रा. लोणखेडी, ता. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार ते ९ जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतातून घरी जात होते. तेव्हा गावातील विजय रामकृष्ण पाटील हा त्यांच्या घराजवळ उभा होता. त्याने फिर्यादीस पाहून पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू होत नाही, आपण शेतात जाऊन येऊ, असे सांगितले. त्यावर होकार देत दोघे शेतात गेले. वीजपुरवठा नसल्याने विजयने फिर्यादी शेतकरी पाटील यांना अशोक पंडित वाणी यांच्या शेतात नेले.

पाणीपातळी बघण्याच्या बहाण्याने विहिरीजवळ नेले. तेथे विजय याने अनपेक्षितपणे पाठीमागून फिर्यादी शालिग्राम पाटील यांना लाथ मारल्याने ते विहिरीत पडले. नंतर संशयित विजय पाटील तेथून निघून गेला. शेतकरी शालिग्राम पाटील यांना पोहता येत असल्याने त्यांनी विहिरीचा कोपरा धरून आरडाओरडा सुरू केली. (latest marathi news)

मात्र, वाचविण्यासाठी कोणी आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास शालिग्राम पाटील यांचा मुलगा व ग्रामस्थ शालिग्राम यांचा शोध घेत अशोक वाणी यांच्या शेतात दाखल झाले. तेव्हा त्यांना शालिग्राम पाटील विहिरीत दिसले. त्यांना बाहेर काढण्यात आले. नंतर फिर्यादी शालिग्राम पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानुसार संशयित विजय पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT