Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : संतापजनक घटना! धुळ्यात बालकाची निघृण हत्या; दोन संशयितांना अटक

Crime News : संशयित दोघांनी कॉम्प्रेसर मशिनच्या पाईपद्वारे गुद्‍द्वारात हवा भरून १४ वर्षीय बालकाचा खून केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग (ता. धुळे) शिवारात संशयित दोघांनी कॉम्प्रेसर मशिनच्या पाईपद्वारे गुद्‍द्वारात हवा भरून १४ वर्षीय बालकाचा खून केला. ही संतापजनक घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी घडली. मोहम्मद खालीक मोहम्मद गनीब (रा. सुखासन बोरीयारी, जि. कटियार, बिहार) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. (Brutal killing of child Two suspects arrested)

टायर पंक्चर दुकानचालक मोहम्मद मुजाहिद आलम (रा. मोहना चांदपूर, ता. मोमीन टोला, जि. पटीहार, बिहार, ह.मु. सिटी पॉइंट हॉटेलजवळ, लळिंग शिवार, ता. धुळे) यांच्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. ६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास हॉटेल सिटी पॉइंटच्या आवारातील फेमस टायर हाउस येथे शिवाजी लक्ष्मण सुळे (रा. शिंदेनगर, मोहाडी) याने मोहम्मद खालीक याला पकडून ठेवले. (latest marathi news)

रोहित राजू चंद्रवंशी (रा. लळिंग, ता. धुळे) याने टायर पंक्चर दुकानासमोर ठेवलेल्या कॉम्प्रेसर मशिनचा पाइप सुरू करून खालीकच्या गुद्‍द्वारास लावल्याने मशिनमधील हवा पाइपाद्वारे त्याच्या पोटात गेली. परिणामी, खालीकच्या पोटातील अवयवांना गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस दोघे कारणीभूत आहेत. त्यावरून संशयित दोघांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात खुनासह पॉक्सोच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मध्यरात्री दोन्ही संशयितांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस, शिंदे शरद पवारांच्या भेटीला, दोघेही ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Babar Azam : पाकड्यांचा 'बाबर', युवा खेळाडूंसमोरही ढेपाळला... नवख्या पोरानं बाद केल्यानंतर चिडला अन् बॅट आपटली Video

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तटकरेंच्या विधानाने खळबळ; म्हणाले, ''अजित दादा असते तर…''

Latest Marathi News Update : विमा वितरण खर्च कमी करण्यासाठी नियामक संस्थेचे नवे प्रस्ताव, ग्राहकांना अधिक फायदेशीर ठरणार; आर. दोराईस्वामी यांचे मत

Pune News: सिंहगड संस्थेच्या १० शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश;शिक्षण विभागाचा मोठा निर्णय थकीत वेतनामुळे शिक्षकांचा अध्यापनावर बहिष्कार; सहा माध्यमिक आणि चार प्राथमिक शाळांचा समावेश,

SCROLL FOR NEXT