Fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक; सौदापावती रद्द करण्यासाठी 4 लाखांची मागणी

Dhule Fraud : शेतजमिनीची सौदा पावती झालेली असताना शेतमालकाची दिशाभूल करत दलालाने शेतजमिनीचा खोटी सौदापावतीचा स्टॅम्प करून शेतकरी तथा व्यापाऱ्याची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Crime : शेतजमिनीची सौदा पावती झालेली असताना शेतमालकाची दिशाभूल करत दलालाने शेतजमिनीचा खोटी सौदापावतीचा स्टॅम्प करून शेतकरी तथा व्यापाऱ्याची फसवणूक केली. तसेच सौदापावती रद्द करण्यासाठी व्यापाऱ्याकडे चार लाखांची मागणी केली. या प्रकरणी दलालाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (Dhule Crime Fraud of farmer by broker)

शेतकरी तथा व्यापारी सुभाष छगनलाल ओसवाल (वय ६३, रा. गल्ली क्रमांक ४, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार १२ नोव्हेंबर २०२३ ला मोतीलाल सोनवणे (रा. दुसाणे, ता. साक्री) याने पंचाळे (ता. साक्री) येथील गट क्रमांक १० क्षे. हेक्टर ०२ आर या शेताची साक्षीदार म्हणून सौदापावती करून त्यापोटी त्याने शेतमालकास आगाऊ रक्कम देण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले.

तसेच सोनवणे याने सुभाष ओसवाल यांच्याकडून दलाली म्हणून एक लाख ८० हजार घेतले. शेतजमिनीची सौदापावती झालेली असताना मोतीलाल सोनवणे याने जाणीवपूर्वक शेतजमिनीच्या मूळ मालकाला उलटसुलट सांगून शेतमालकाची दिशाभूल केली. (latest marathi news)

तसेच त्यास जास्त पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या नावाने शेतजमिनीचा सौदापावतीचा स्टॅम्प करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. नंतर सौदापावती रद्द करण्यासाठी वेळोवेळी चार लाख रुपयांची मागणी करत सुभाष ओसवाल यांना शिवीगाळ करत ठार करण्याची धमकी दिली. त्यावरून दलाल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार का? महत्त्वाची अपडेट समोर

Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

FIFA World Cup 2026 : इंग्लंडच्या सामन्याचे एक तिकीट तीन लाख ३१ हजार रुपयांना

Latest Marathi News Live Update : वरंधा घाटात दरड कोसळली, महाड-पंढरपूर मार्ग ठप्प

Mirya Nagpur Highway : दरीच्या बाजूला उंच सिमेंटच्या भिंती, डोंगरकड्याला लोखंडी कवच; मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाट आता झाला 100 टक्के सुरक्षित?

SCROLL FOR NEXT