Group Development Officer Vijay Londhe arrested on Thursday by a team of Nandurbar Anti-Corruption Department. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bribe Crime : गटविकास अधिकारी व लेखापालाला अक्कलकुवा येथे लाच घेताना अटक

Bribe Crime : अक्कलकुवा पंचायत समितीत गुरुवारी (ता. २५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येथील गटविकास अधिकारी व लेखापाल यांना एकूण २६ हजारांची लाच घेताना पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bribe Crime : अक्कलकुवा पंचायत समितीत गुरुवारी (ता. २५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येथील गटविकास अधिकारी व लेखापाल यांना एकूण २६ हजारांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले होते. (Group Development Officer and Accountant arrested for taking bribe in Akkalkuwa)

केलेल्या कामांच्या बिलासाठी पाठपुरावा सुरू होता; परंतु बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यांवर वर्ग केली जात नव्हती. शेवटी दोन लाख ४६ हजार ८५० वर्ग केले. तक्रारदार यांच्या बँक खात्यात मिळाले; परंतु बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढून देणे अशा एकूण तीन बिलांची रक्कम काढण्यासाठी लाच मागितली. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अक्कलकुवा पंचायत समितीचे सहाय्यक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे (वय ४७) यांना आठ हजार, तर अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे (वय ३९) यांना १८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

सदरच्या कारवाईत संबंधितांवर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलिस नाईक देवराम गावित, हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले यांच्या पथकाने कारवाई केली.

नेहमी वादाच्या भोवऱ्यात होते लोंढे...

अक्कलकुवा गटविकास अधिकारी विजय लोंढे हे आपल्या मनमानी कारभाराने नेहमी वादग्रस्त ठरले. पंचायत समिती सदस्य असो की लोकनेते, सरपंच यांच्याशी विविध कारणांवरून हुज्जत घालत असे. या विषयी अनेकदा तक्रारी, आंदोलनही करण्यात आले. परंतु, याचा त्यांना काहीही फरक पडत नसे.

जनावरांच्या गोठ्यासाठी बायपास सुविधा

अक्कलकुवा येथे लोंढे यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी गोठा वाटपावर मोठा भर दिला. प्रस्ताव आणा, ठरलेली रक्कम द्या आणि वर्क ऑर्डर मिळवा, अशी बायपास सुविधा सुरू केली होती. ज्यामुळे तालुक्यात ज्यांच्याकडे एक जनावर नाही, अशांनाही या योजनेत लाभ मिळाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येईल, अशी चर्चा पंचायत समिती आवारात दिवसभर सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT