Shindkheda Gutkha seized by the police near the railway station here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिंदखेडा रेल्वे स्टेशनजवळ अडिच लाखांचा गुटखा जप्त! शिंदखेडा पोलिसांनी कारवाई

Dhule Crime News : शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर शिंदखेडा रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन लाख ३४ हजार ८० रूपये किंमतीचा गुटखा शिंदखेडा पोलिसांनी जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर शिंदखेडा रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोन लाख ३४ हजार ८० रूपये किंमतीचा गुटखा शिंदखेडा पोलिसांनी जप्त केला. याबाबत शनिवारी (ता.२७) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून संशयिताला अटक करण्यात आली आहे. (Gutkha worth 2 and a half lakh seized near shindkheda railway station)

अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार (वय ४०) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, महेश पितांबर चौधरी (वय ३८, रा. नगरपंचायतीजवळ, शिंदखेडा) शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर शिंदखेडा रेल्वे स्टेशनलगत केसरयुक्त विमल पानमसाला (एकूण पाकिटे ६२४, एकूण किंमत एक लाख १६ हजार ६८८ रूपये).

तंबाखू (एकूण पाकिटे ६२४, किंमत २० हजार ५९२ रूपये), केसरयुक्त विमल पानमसाला (एकूण पाकिटे ४४०, किंमत ८७ हजार १२० रूपये) व तंबाखू (एकूण पाकिटे ४४०, किंमत ९ हजार ६८० रूपये) असा एकूण किंमत दोन लाख ३४ हजार ८० रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. (Latest Marathi News)

संशयित आरोपी महेश पितांबर चौधरी याला शुक्रवारी सायंकाळी शिंदखेडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Satara Ganpati Visarjan Video : भगवान शंकराची कृपा? मामाच्या डोक्यावर सुरक्षित नाचतो गणपती! पाहा अद्भुत क्षण

Latest Maharashtra News Updates : त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी सरकारकडून समिती सदस्यांची नियुक्ती

TET Exam : टीईटी बंधनकारक, प्रमोशन नाहीच; सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश

Chandra Gochar 2025: 7 सप्टेंबरपासून 'या' राशीचे नशीब बदलेल, आर्थिक संकटातून मिळेल मुक्तता

SCROLL FOR NEXT