Crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : 2 कॅफेंवर ‘एलसीबी’चे छापे; अशोभनीय कृत्य

Dhule Crime : गैरप्रकारास उत्तेजन देणाऱ्या दोन कॅफेंवर ‘एलसीबी’ने छापे टाकत मंगळवारी (ता. २) कारवाई केली. त्यात संशयित तरुण-तरुणींची तीन जोडपी मिळून आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : गैरप्रकारास उत्तेजन देणाऱ्या दोन कॅफेंवर ‘एलसीबी’ने छापे टाकत मंगळवारी (ता. २) कारवाई केली. त्यात संशयित तरुण-तरुणींची तीन जोडपी मिळून आली. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल झाले. देवपूरमधील जीटीपी स्टॉप येथील दीप कॉम्प्लेक्समधील युनिक कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अशोभनीय कृत्य चालते. (Dhule Crime LCB raids on 2 cafes)

कॅफेचालकाकडून गैरकृत्यास उत्तेजन दिले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ एलसीबीच्या पथकाला कारवाईचा आदेश दिला. पथकाने मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास युनिक कॅफेवर छापा टाकला. तेव्हा कॅफेमध्ये तरुण-तरुणींची दोन जोडपी अशोभनीय कृत्य करताना आढळली.

दीप कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे नाव नसलेल्या व बाहेरून कुलूप लावलेल्या एका कॅफेमध्ये जोडपे असल्याची माहिती मिळाल्याने त्या कॅफेच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून पाहिले असता आतमध्ये एक जोडपे मिळून आले.

दोन्ही कॅफेंची पाहणी केली असता अशोभनीय कृत्य करण्यास सुलभ व्हावे, यासाठी बैठकव्यवस्था केल्याचे व एक तासाचे चारशे रुपये आकारले जात असल्याचे समजले. ताब्यात घेतलेल्या तरुण व तरुणींच्या पालकांना देवपूर पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी कॅफेचालक भावेश अनिल कौलस्कर (रा. माधवपुरा, धुळे), भावेश पांडुरंग हळदे (रा. देवपूर, धुळे) व मदतनीस धीरज विजय मोरे (रा. नगावबारी, धुळे) या तिघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एलसीबीचे योगेश राऊत, अमरजित मोरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, शशी देवरे, देवेंद्र ठाकूर, शीला सूर्यवंशी, कैलास महाजन यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT