Dhule Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : खूनप्रकरणी एकाला जन्मठेप! धुळे सत्र न्यायालयाचा निकाल

Dhule News : सुकापूर (ता. साक्री) येथील पंढरीनाथ रामा ठाकरे याच्या खूनप्रकरणी आरोपी आत्माराम ऊर्फ आत्मा धोंडू बहिरम याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सुकापूर (ता. साक्री) येथील पंढरीनाथ रामा ठाकरे याच्या खूनप्रकरणी आरोपी आत्माराम ऊर्फ आत्मा धोंडू बहिरम याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी हा निकाल दिला. ही घटना २३ मे २०२१ ला घडली होती. आत्माराम बहिरम याने पत्नीचा शोध घेत पंढरीनाथ रामा ठाकरे यांच्या शेतात येऊन विचारणा केली. (Life imprisonment for murder)

त्यावेळी त्याने लाकडी दांडक्याने ठाकरे यांच्यावर हल्ला चढवीत बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी ठाकरे यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासासाठी दाखल केले. धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना २९ मे २०२१ ला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मंजुळाबाई यशवंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांच्यापुढे सुनावणीसाठी आला. सरकार पक्षातर्फे खटल्याचे काम अ‍ॅड. गणेश वाय. पाटील यांनी पाहिले. एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. घटनास्थळाचे पंच, साक्षीदार, हत्यार जप्तीचे पंच व साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी यांच्या तसेच दुय्यम तपासी अधिकारी भूषण हंडोरे. (latest marathi news)

वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश भामरे, डॉ. राकेश मोहने, डॉ. रमेश गढरी यांची साक्ष नोंदविण्यात आली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. गणेश पाटील यांचा युक्तिवाद तसेच साक्षी पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा सांगोपांग विचार करून न्या.

पुलाटे यांनी आत्माराम ऊर्फ आत्मा धोंडू बहिरम याला जन्मठेपेची शिक्षा तसेच दहा हजारांचा दंड व तो न भरल्यास एक वर्षाची शिक्षा आणि अन्य कलमात दोन वर्षांची शिक्षा व पाच हजारांचा दंड, तो न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षा सुनावली. अ‍ॅड. पाटील यांना जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. देवेंद्रसिंग तवर यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT