angry mob attacked police station in Shindkheda and damaged government and private vehicles by pelting stones. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिंदखेडा पोलिस ठाण्यावर जमावाचा हल्ला! शासकीय, खासगी वाहनांचे नुकसान

Dhule News : वरपाडे (ता. शिंदखेडा) येथे मुलीस धक्का लागल्याच्या निमित्ताने दोन गटांत शुक्रवारी (ता. ३१) रात्री वादाची ठिणगी पडली, तो वाद शिंदखेडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : वरपाडे (ता. शिंदखेडा) येथे मुलीस धक्का लागल्याच्या निमित्ताने दोन गटांत शुक्रवारी (ता. ३१) रात्री वादाची ठिणगी पडली, तो वाद शिंदखेडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. गावात मुलीस धक्का देणाऱ्याविरुद्ध आदिवासी समाजात अफवा पसरल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत १०० ते १५० जणांच्या जमावाने शिंदखेडा पोलिस ठाण्यात गर्दी केली.

संशयिताला ताब्यात देण्याची मागणी करीत संतप्त जमावाने पोलिस ठाण्याच्या इमारतीवर व शासकीय वाहनांवर दगडफेक केली. या घटनेमुळे शिंदखेडा शहरात रात्री तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शनिवारी (ता. १) शिंदखेडा न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. इतर संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

वरपाडा येथे शुक्रवारी रात्री आदिवासी समाजाचा लग्नसोहळा होता. पूना दौलत ठाकरे व सुरेश भिवसन रामेश्वर यांच्यात मुलीस धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला, तो थेट शिंदखेडा पोलिस ठाण्यापर्यंत आला. ही बातमी लग्न सोहळ्यातील वऱ्हाडींना तसेच वरपाडा गावातील आदिवासी समाजाला समजली.

त्यामुळे १०० ते १५० जणांचा जमाव शिंदखेडा पोलिस ठाण्यावर चालून आला. संतप्त जमावातील काहींनी सुरेश भिवसन रामेश्वर यास आमच्या ताब्यात द्या, पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नका, असे म्हणून पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कार्यालयात हुज्जत घालणे सुरू केले. संतप्त जमावाला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. (latest marathi news)

मात्र, जमाव ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. जमावाने शुक्रवारी रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान थेट पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. पोलिस ठाण्याच्या आवारातील शासकीय व खासगी वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई विशाल दिलीप सोनवणे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विशाल देवा ठाकरे, महेंद्र सुकदेव सोनवणे, जितेंद्र तुकाराम मालचे.

अंबर सुरसिंग मोरे, लखन उखा ठाकरे, गोरख रवींद्र मालचे, कैलास सुक्राम पवार (सर्व रा. शिंदखेडा) व इतर १००-१५० जणांविरोधात शासकीय कामात अडथळ्यासह सार्वजनिक संपत्तीस हानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील सात संशयित आरोपींना शिंदखेडा पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी दुपारी शिंदखेडा न्यालयात हजर केले असता रविवार (ता. २)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

उपअधीक्षकांसह वरिष्ठांची भेट

शिंदखेडा पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाने हल्ला केल्यावर लगेच दोंडाईचा, नरडाणा, शिरपूर येथील पोलिस बल मागविण्यात आले होते. घटनास्थळी शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, दोंडाईचाचे प्रभारी नीलेश मोरे, सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर यांनी भेटी दिल्या.

महिन्यात तिसऱ्यांदा झाला ‘हल्ला’

शिंदखेडा पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून दीपक पाटील प्रभारी अधिकारी म्हणून हजर झाल्यापासून पोलिस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिस ठाणेच सुरक्षित नाही, तर जनता कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेमध्ये पोलिस ठाण्यावर ४ मेस, २२ मेस व ३१ मेस शिंदखेडा पोलिस ठाण्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांचे ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT