LCB police inspector Shriram Pawar and team along with seized bike, mobile and thief. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दुचाकीसह मोबाईल हस्तगत; एलसीबीची कारवाई

Dhule Crime : स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत चोरट्याला जेरबंद केले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाईल असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत केला. शहरातील चक्करबर्डी रोडवरील भाईजी नगर (प्लॉट क्रमांक-५०) येथील रहिवासी अंकीत दिलीप अग्रवाल हे २१ एप्रिलला रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुझुकी कंपनीच्या अ‍ॅक्सेस-१२५ स्कुटीने शहाद्याकडून धुळ्याकडे येत होते.

त्यादरम्यान ते हॉटेलवर जेवणासाठी थांबले असता अज्ञात व्यक्तीने त्यांची दुचाकी व त्यात ठेवलेला मोबाईल लंपास केला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू असताना नगावबारी परिसरात एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितास नगावबारी परिसरातून ताब्यात घेतले.

त्याने त्याचे नाव धनराज सुरसिंग भिल (वय-२५, रा. सायने, ता. धुळे, ह.मु. पांझरा नदीकिनारी, मरिमाई भिलाटी, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी व पाच हजारांचा मोबाईल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. संशयितास पुढील तपासासाठी सोनगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्री. पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, शशी देवरे, हर्शल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT