Cylinders seized in the operation conducted by the LCB team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : अवैध मिनी गॅस पंपावर छापे! LCB कडून मुद्देमाल जप्त; तिघे ताब्यात

Latest Crime News : शहरात विविध तीन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनात इंधन म्हणून गॅस भरून देत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तीन अवैध मिनी गॅस पंपावर छापे टाकले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेत दहा सिलिंडरसह एकूण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (Raid on Illegal Mini Gas Pump)

शहरात विविध तीन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या वाहनात इंधन म्हणून गॅस भरून देत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाईचे निर्देश दिले.

त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शहरात तीन ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. त्यात पारोळा रोड कॉटन मार्केटपुढे नक्षत्र रिसॉर्टजवळ पत्र्याच्या शेडमधून तीन सिलिंडर, नोझल, इलेक्ट्रिक मोटार व वजन काटा, असा १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शाकीर अकील पिंजारी (वय ३३, रा. एकवीरादेवी मंदिराजवळ, धुळे) याच्याविरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (latest marathi news)

पांझरा नदीलगत उद्योग

पांझरा नदीलगत गणपती मंदिरपासून काही अंतरावर सिद्धेश्वर प्रोव्हिजनच्या बाजूला पत्र्याच्या शेडमधून पाच सिलिंडर, दोन नोझल, इलेक्ट्रिक मोटार व वजन काटा, असा २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी सखाराम विठ्ठल गवळी (वय २३, रा. मोगलाई, गवळीवाडा, पांझरा नदी किनारी, धुळे) व रूपेश भटू गवळी (वय ४१, रा. साईबाबानगर, नकाणे रोड, धुळे) या दोघांवर गुन्हा नोंद झाला.

पत्र्याच्या शेडमध्ये पंप

तिसरी कारवाई शहरातील चिराग हॉस्पिटलच्या पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये केली. तेथून दोन सिलिंडर, गॅस भरण्याचा पंप, नोझल, विद्युत मोटार व वजन काटा, असा १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फकिर आमीरशाह बावू शाह ऊर्फ हाम्झा (वय २५, रा. गल्ली क्रमांक २, मोगलाई, चर्चजवळ, साक्री रोड, धुळे) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयितांकडील दहा गॅस सिलिंडर व गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT