Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सारंगखेडा आठवडे बाजारात चोरांचा धुमाकूळ! नागरीकांमध्ये दहशत; पोलिसांसमोर आव्हान

Crime News : रविवारी (ता.७) आठवडे बाजारात आलेल्या ग्राहकांचे एकाच दिवशी पाच ते सहा नामांकित कंपनीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.

सकाळ वृत्तसेवा

कळंबू : गेल्या काही महिन्यांपासून सारंगखेडा आठवडे बाजारात चोरांचा सुळसुळाट थांबला होता. मात्र, पुन्हा बाजारात मोबाईल चोरांनी उच्छाद घातला आहे. रविवारी (ता.७) आठवडे बाजारात आलेल्या ग्राहकांचे एकाच दिवशी पाच ते सहा नामांकित कंपनीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे नागरीकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. (Dhule Crime Sarangkheda thieves marathi news)

सारंगखेडा (ता. शहादा) येथे दर रविवारी मोठा आठवडे बाजार भरतो. येथील बाजाराला दूरवरून व्यावसायिक व खेड्यावरील नागरिक येतात. मात्र, येथील बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांनी उच्छाद घातल्याने ग्राहक धास्तावले आहेत. वर्षभरापूर्वी मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसला होता.

मात्र, रविवारच्या बाजारात चोरट्यांनी तब्बल पाच ते सहा ग्राहकांचे मोबाईल हडप केल्याने नागरीक धास्तावले आहेत. बाजारात मोबाईल चोरीची दिवसभर चर्चा सुरू होती. गेल्यावर्षी दर बाजारच्या दिवशी मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. मात्र, मध्यंतरी काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा मोबाईल चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे.  (latest marathi news)

त्यामुळे सारंगखेडा आठवडे बाजार चोरट्यांसाठी रविवारचा आठवडे बाजार गोल्डन चान्स ठरत आहे. पोलिसांनी आठवडे बाजाराच्या दिवशी ठिकठिकाणी करडी नजर ठेवावी, अशी मागणी ग्राहक व व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

तपास कागदावरच

सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, पुसनद घरफोडी, सारंगखेडा वडाळी सराफ दुकानातील चोरी, शेती उपयुक्त साहित्याची चोरी अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांचा तपास अद्यापही कागदावरच असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT