Jailed esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: दोघांना 8, एकास 3 वर्ष सश्रम कारावास; वर्षी येथील खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा

Crime News : हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयासमोर चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्रसिंह तंवर यांनी कामकाज पाहिले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : वर्षी (ता.शिंदखेडा) येथे २०२१ मध्ये झालेल्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना प्रत्येकी आठ वर्षे तर एका आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी हा निकाल दिला. (Dhule Crime 2021 murder case Punishment by District Sessions Court)

वर्षी (ता. शिंदखेडा) येथील संजय निंबा कोळी यांची पुतणी लीना ज्ञानेश्वर कोळी (वय ९) ही बालिका ३ ऑगस्ट २०२१ ला गावातील खालची भिलाटी भागात काकडी विकण्यासाठी गेली होती. त्यावेळी प्रकाश भीमराव पांचाळ याने तिच्याकडून दहा रुपयांची काकडी घेतली.

मात्र, पैसे दिले नाहीत. तसेच लीनाला मारहाण केली. ही बाब तिने काका युवराज मंडाले यांना सांगितली. त्यानंतर काका युवराज व लीना असे दोघे प्रकाश पांचाळ याच्याकडे गेले व जाब विचारला. ही माहिती संजय निंबा कोळी व विजय निंबा कोळी या दोघांना समजल्यावर ते दोघेही त्याठिकाणी पोचले.

त्यावेळी प्रकाश पांचाळ हा लोखंडी पास घेऊन युवराज मंडाले यांच्या अंगावर धावून आला. तसेच विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या दोघांनी संजय कोळी यांना जबर मारहाण करून जमिनीवर आपटले. विशाल याने संजय कोळी यांच्या छातीवर बसून त्यांचे डोके जमिनीवर आपटले.

या मारहाणीत संजय कोळी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवराज मंडाले यांच्या फिर्यादीवरून प्रकाश पांचाळ, विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या तिघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. (latest marathi news)

अखेर तिघांना शिक्षा

हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांच्या न्यायालयासमोर चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. देवेंद्रसिंह तंवर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार युवराज मंडाले, विजय मंडाले, बाल साक्षीदार लीना कोळी यांच्यासह एकूण आठ साक्षीदार तपासले. या खटल्यात अ‍ॅड. तंवर यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांचे दाखले देऊन युक्तिवाद केला.

शिवाय, मृत संजय यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. कामकाजाअंती न्यायाधीश आहेर यांनी विशाल पांचाळ व मुकेश पांचाळ या दोघांना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी आठ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

तर प्रकाश पांचाळ याला भांदवि कलम ३५२ अन्वये दोषी ठरवून तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच घटनेतील मृत संजय कोळी यांच्या परिवारास चौकशी करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. या खटल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे, पैरवी अधिकारी साहेबराव मोरे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना शेती तारण कर्ज द्यायला बॅंकांचा नकार; पीककर्ज देण्यापूर्वी तपासला जातो शेतकऱ्याचा ‘सिबिल’ स्कोअर अन्‌...

आजचे राशिभविष्य - 19 जून 2026

कॉफीप्रेमींनो, एकदा तरी ट्राय करा संत्र्याचा रस आणि कॉफीचा हटके कॉम्बो! लगेच नोट करा रेसिपी

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

SCROLL FOR NEXT