Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : बंदूक घेऊन हिंडणारे दोघे झटापटीनंतर पळाले! लळिंग कुरणातील घटना; शोध सुरू

Crime News : त्यांच्याकडे असलेली बंदूक वनपाल सांगळे यांच्या ताब्यात आली. या घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने कुरणात संशयित तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहराच्या दक्षिणेला लळिंग (ता. धुळे) वनक्षेत्रातील कुरणात हवेत गोळ्या झाडण्याची बंदूक घेऊन दोन जण फिरत असल्याचे आढळले. वनपाल नितीन सांगळे यांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला; परंतु दुचाकीस्वार दोघे तरुण झटापटी करून पळून गेले. मात्र, त्यांच्याकडे असलेली बंदूक वनपाल सांगळे यांच्या ताब्यात आली. या घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने कुरणात संशयित तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. (two who walking around with gun ran away after fight at Laling Kuran)

काही वर्षांत नागरिकांना वनसंवर्धनाचे महत्त्व लक्षात आले. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संस्थांचे सभासद दर वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी लळिंग कुरणात वृक्षारोपण करतात. अलीकडेच निरनिराळ्या क्षेत्रातील नागरिकांनी लळिंग कुरणात २५ हजारांवर बिया असलेले मातीचे गोळे रोपले. धाराऊ वृक्ष समितीने काही प्रमाणात वृक्षारोपण केले. वृक्षसंवर्धनामुळे वनक्षेत्रात वन्यपशु-पक्ष्यांची संख्या वाढली आहे. बिबटे, रानगवे, हरीण, ससे, साळिंदर यांसारखे प्राणी लळिंग कुरणात वाढीस लागले आहेत.

एकीकडे निसर्गाबाबत आस्था असणारे असताना दुसरीकडे निसर्गाला हानी पोचविणारेदेखील आहेत. दोन दिवसांपूर्वी लळिंग कुरणात दोन तरुण दुचाकीने आल्याचे वनपाल सांगळे यांच्या लक्षात आले. त्यांनी दोन्ही तरुणांची चौकशी केली. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाच्या हातात पिशवी होती. (latest marathi news)

सांगळे यांनी पिवशीत काय आहे, अशी विचारणा केली. तेव्हा तरुणांनी सांगळे यांच्याशी झटापट करीत पळ काढला. पिवशीतील हवेत गोळ्या मारणारी बंदूक खाली पडली. सांगळे यांनी ती ताब्यात घेतली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांना सांगळे यांनी माहिती दिली. संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर वन कायदा १९७२ नुसार कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ओबीसी क्रिमी लेयरवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र सरकार तणावात; स्पष्टीकरणासाठी याचिका

Shaina NC Rahul Gandhi : समान नागरी कायद्याला पाठिंबा द्या आणि बहुपत्नीत्व बंद करा; हिंदू धर्म, 'मनुस्मृती'वरून शिवसेना नेत्या शायना एनसींचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

Kolhapur Direct Pipeline: थेट पाईपलाईनसाठी स्वतंत्र सबस्टेशनचा प्रस्ताव द्या राजेश क्षीरसागर यांची महावितरणला सूचना

Marathi News Live Updates : पाटणामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Vaibhav Sooryavanshi: ३ चेंडूंत २ विकेट्स! वैभवने गोलंदाजीत प्रतिस्पर्धींना गार केले, संघाची डावाने विजयाच्या दिशेने वाटचाल, Video

SCROLL FOR NEXT