crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मद्यपी पतीच्या मारहाणीत पत्नी ठार; सांगवी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

Latest Crime News : ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री अकराला बुडकी (ता. शिरपूर) येथे घडली होती. संशयित पतीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : मद्यपान केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने पतीकडून बेदम मारहाण झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २३) रात्री अकराला बुडकी (ता. शिरपूर) येथे घडली होती. संशयित पतीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Wife killed by drunken husband)

सुमन आत्माराम पावरा (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा विवाह बुडकी येथील आत्माराम बोन्या पावरा याच्याशी झाला होता. आत्माराम पावरा याला मद्याचे व्यसन असल्याने तो नेहमीच मद्यधुंद होऊन पत्नीला मारहाण करीत होता.

सोमवारी (ता. २३) रात्री अकराला तो घरी मद्यपान करून आला. त्यावर पत्नी सुमन हिने तुम्ही रोज रोज दारू का पिता, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी पोटावर, कमरेवर मारहाण केली. त्यामुळे तिच्या पोटात दुखू लागल्याने, तिला बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (latest marathi news)

दरम्यान, ही बाब कळताच तिचा भाऊ धरमसिंह पावरा (रा. कोडीद, ता. शिरपूर) याने आईसह उपजिल्हा रुग्णालयात सुमनची भेट घेतली. त्या वेळी तिने पतीने केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याचे सांगितले. तिच्या पोटाला सूज आल्याने रुग्णवाहिकेद्वारे धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी साडेसातला तिचे निधन झाले.

बुधवारी (ता. २५) तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर भाऊ धरमसिंह पावरा यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती आत्माराम पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला शुक्रवारी (ता. २७) मध्यरात्री बाराला अटक करण्यात आली. उपनिरीक्षक मिलिंद पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT