Municipal fire brigade personnel dousing the fire at a textile shop on Agra Road in the city. In the second picture, the condition of the shop in the fire. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : भीषण आगीत कापड दुकान खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Dhule : शहरातील महात्मा गांधी चौकाजवळील एका कापड दुकानाला रविवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील महात्मा गांधी चौकाजवळील एका कापड दुकानाला रविवारी (ता. १०) रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आगीत ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (dhule Damage estimated at 50 lakhs to cloth shop in severe fire marathi news)

शहरातील आग्रा रोडवरील कृष्णदीप अमरकला ड्रेसेस हे कापड दुकान आहे. त्यास रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. मुख्य बाजारपेठेत दुकान असल्याने एकच धावपळ उडाली. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (latest marathi news)

अग्निशामक दलाचे अधिकारी व लीडिंग फायरमन राजन महाले, वाहनचालक प्रशांत मुर्तडक, सिद्धार्थ खैरनार, धनंजय खैरनार, नीलेश सोनवणे, सुभाष गायकवाड, फायरमन किरण साळवी, योगेंद्र जाधव, अमोल सोनवणे, कुणाल ठाकूर, पांडुरंग पाटील आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आगीत अंदाजे ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याचे दुकान मालक कीर्तिविजय कुमार रेलन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT