Loss of farmers in kuve area due to stormy rains. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूर तालुक्यातील निवे येथे वादळी पावसाने पिके भुईसपाट; शेतात काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान

Dhule : तालुक्यातील कुवे परिसरात शुक्रवारी (ता.१) दुपारी वादळ आणि पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतातून काढून ठेवलेला शेतमाल जमिनदोस्त झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील कुवे परिसरात शुक्रवारी (ता.१) दुपारी वादळ आणि पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतातून काढून ठेवलेला शेतमाल जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. (Dhule Damage to crops kept in fields due to stormy rains at nive in Shirpur taluka)

कुवे परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनला वादळ व पाठोपाठ पावसाने अर्धा तास धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या अस्मानी आपत्तीमुळे शेतकरी भांबावून गेले. त्यांच्या डोळ्यादेखत तयार झालेला शेतमाल हवेत उधळला गेला. पाठोपाठ उभी पिकेही कोलमडून पडली. कष्टाने फुलवलेला शेतमाल वाहून जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

मका, हरभरा, बाजरी, गहू, ज्वारी आदी पिकांसाठी कुवे परिसर प्रसिद्ध आहे. मक्याच्या पेरणीला तीन महिने पूर्ण झाले आहेत. यंदा दीर्घकाळ थंडी असल्यामुळे गहू आणि हरभराही जोमात होते. काही ठिकाणी कापणी करुन पिके वाळवण्यासाठी बांधावर, खळ्यात ठेवली होती.

उर्वरित पिके काढणीच्या अवस्थेत होती. वादळाने बांधावरील शेतमाल उडवून नेला तर शेतातील उभी पिके जमीनदोस्त केली. हाताशी शिल्लक शेतमाल वेचून सुरक्षित ठिकाणी नेण्यात शेतकरी गुंतले आहेत. दरम्यान, परिसरात अद्यापही अभ्राच्छादित वातावरण असल्याने बळिराजा चिंतेत आहे.(latest marathi news)

यांचे झाले नुकसान

रामसिंह राजपूत, रतिलाल पाटील, नरेंद्र राजपूत, भीमसिंह राजपूत, प्रल्हाद चौधरी, जयसिंह राजपूत, सुनील चौधरी, हिरालाल गुजर, नारायण राजपूत (सर्व मका), प्रल्हाद चौधरी (बाजरी), सुभाष चौधरी (हरभरा व ज्वारी), ज्ञानेश्वर मराठे (गहू).

"शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यंदा पिके जोमात असल्याने मागील नुकसान भरुन निघेल, अशी अपेक्षा होती. पण, अस्मानी आपत्तीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करुन नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करावेत."- डॉ.गंगाराम गुजर, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT