In Dhule district, fines of Rs 1 thousand each were recovered from 17 bullet riders.jpg 
उत्तर महाराष्ट्र

कर्कश आवाज करणाऱ्या १७ बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई

रमाकांत घोडराज

धुळे : बुलेटच्या फायरिंगमध्ये (आवाजात) कृत्रिम बदल करून शहरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना गुरुवारी (ता. २५) वाहतूक शाखेने कारवाईचा हिसका दाखविला. या कारवाईत १७ बुलेटस्वारांकडून प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच कागदपत्रे, नियमानुसार नंबर प्लेट, सायलेन्सरमध्ये केलेला बदल आदींची तपासणी करून बुलेट जमा करण्यात आल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
एकीकडे सामान्य नागरिकांना रोज इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. या इंधन दरवाढीमुळे वाहने वापरावीत की नाही, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहतो. दुसरीकडे मात्र काहीही कारण नसताना केवळ रुबाब दाखविण्यासाठी काही जण शहरात मोटारसायकली फिरवत राहतात. त्यातही बुलेटस्वारांनी कहर केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे बुटेल चालवून फटाके वाजविण्याचा प्रकार होतो. अनेक जणांनी बुलेटचा आवाज कृत्रिमरीत्या बदलून कर्कश आवाजाने बुलेट चालविण्याचा प्रकार सुरू केल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

अशा काही बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी संगीता राऊत यांनी पुढाकार घेतला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांसह अशा बुलेटस्वारांवर कारवाई केली. अशा १७ बुलेटस्वारांकडून प्रत्येकी एक हजाराप्रमाणे १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपनिरीक्षक दिलीप माळी, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र आखाडे, दीपिका वाघमोडे, आरिफ शेख, पंकज शिंदे, प्रसन्ना पाटील, सुनील कुलकर्णी, मनोहर महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT