fight with corona e-sakal
उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्याची कोरोनाच्या विळख्यातून सुटका

सकाळ डिजिटल टीम

धुळे : महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या (corona update maharashtra) कमी होत आहे. सध्या धुळे जिल्ह्याने योग्य नियोजन आणि सूचनांचे पालन करून कोरोनावर (dhule defeated corona) मात केली आहे. शेवटच्या दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे धुळे हा कोरोनामुक्त झालेला राज्यातील दुसरा जिल्हा ठरला आहे.

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 45843 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 668 जणांचा उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. त्यानंतर लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे हळूहळू का होईना रुग्णांची संख्या कमी होत गेली. सध्या सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असून कोरोनाचे रुग्ण देखील नाहीत. शेवटच्या दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच नवीन रुग्णदेखील सापडले नाहीत. त्यामुळे आरोग्यविभागातर्फे धुळे हा कोरोनामुक्त जिल्हा झाल्याचं घोषित करण्यात आलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट जरी टळलं असलं तरी अद्यापही खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धुळेकरांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

भंडारा कोरोनामुक्त होणारा पहिला जिल्हा -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका हा भंडारा जिल्ह्याला बसला होता. मृत्यूदर देखील जास्त होता. मात्र, नियमांचे पालन करून जिल्ह्याने कोरोनावर मात केली. ४ दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील शेवटच्या रुग्णांना डिस्चार्ज दिला असून हा राज्यातील कोरोनामुक्त होणारा पहिला जिल्हा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT