Bribe esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे वीज कंपनीतील व्यवस्थापक, उपव्यवस्थापकांना 2 लाख भोवले

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील वीज कंपनी कार्यालयातील व्यवस्थापक, उपव्यवस्थापकाला दोन लाखांच्या लाच प्रकरणी अटकेत जावे लागले आहे. त्यामुळे वीज कंपनीत खळबळ उडाली.

तक्रारदार शासकीय विद्युत ठेकेदार आहे. त्याने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात वीज कंपनीतर्फे धुळे जिल्ह्यात विद्युतीकरणासंदर्भात ठेका मिळाला. त्यासाठी जिल्हा नियोजन समितींतर्गत निधी प्राप्त होता.

तक्रारदाराने दोंडाईचा विभाग, धुळे विभाग, धुळे ग्रामीण विभागात उद्दिष्टाप्रमाणे वेळेत शंभर टक्के काम पूर्ण केले. त्याचे कामाचे बिल ५६ लाख ३१ हजार ५९० रुपये झाले. ही रक्कम मंजुरीसाठी ठेकेदाराने वीज कंपनीच्या येथील कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे सादर केली. बिल मंजुरीसाठी तक्रारदाराने संबंधित कार्यालयात तगादा लावला.

बिल मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना वीज कंपनीच्या वित्त विभागाचे व्यवस्थापक अमर खोंडे व उपव्यवस्थापक मनोज पगार यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच लाखांची रक्कम निश्‍चित झाली.

पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना संशयित खोंडे व पगार याला पकडण्यात आले.

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच संशयित दोघे ताब्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate Jalgaon: सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं-चांदीचे भाव कोसळले! राज्यातील सर्वात स्वस्त दरात सोनं; १ तोळा कितीला?

IND vs NZ, 1st Test: केएल राहुलचं शतक, तर जैस्वाल, गिल, पडिक्कल अन् पंतची फिफ्टी; भारताबाहेर टीम इंडियाने रचला नवा इतिहास

Satara Farmer Loan Waiver : तुमचं नाव यादीत आहे का? अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची नवी यादी जाहीर; साताऱ्यातील 5 हजार 578 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या हक्काच्या ३.७२ दशलक्ष घनमीटर पाण्यासाठी शिंदेसेना आक्रमक

मैत्रिणीने फसवलं, ३ नराधमांनी दारू पाजून १७ वर्षीय मुलीवर रात्रभर केले अत्याचार; बेशुद्ध झाल्यावर...; मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT