Arun Taide, Nitendra Panpatil, Abhar Kor, Nitin Masole, Manoj Patil etc. present after confiscation of suspected cotton seeds. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Bogus Seed Sale : गुजरातमधून संशयित कापूस बियाणे धुळ्यात; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bogus Seed Sale : गुजरातमधून एका खासगी ट्रॅव्हल्सद्वारे धुळे शहरात चारशे पाकिटे असलेल्या आठ गोण्या झाशीची राणी पुतळ्याजवळील पद्‌मालय ट्रॅव्हल्स येथे उतरविण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Bogus Seed Sale : गुजरातमधून एका खासगी ट्रॅव्हल्सद्वारे धुळे शहरात चारशे पाकिटे असलेल्या आठ गोण्या झाशीची राणी पुतळ्याजवळील पद्‌मालय ट्रॅव्हल्स येथे उतरविण्यात आल्या. ही माहिती मिळताच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहा लाखांचा संशयित कापसाच्या बियाण्यांचा मुद्देमाल जप्त करीत चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ()

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाट, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, कृषी अधिकारी अभर कोर आदींचे पथक पद्‌मालय ट्रॅव्हल्स येथे दाखल झाले. पंच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी सहाय्यक नितीन मासोळे, मनोज पाटील उपस्थित होते.

तेथे गुजरातच्या कथित कंपनीचे एचटीबीटी कापूस बियाण्यांची चारशे पाकिटे आठ गोण्यांमध्ये उतरविण्यात आल्याचे दिसले. गुजरातमधील मोरे टुर्स ॲन्ड कार्गो (अहमदाबाद) ट्रॅव्हल्सने कापसाच्या बियाण्यांचे आठ पोते महेश (पूर्ण नाव माहीत नाही) याने धुळ्यातील अशोक भाई (पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासाठी पार्सल म्हणून पाठविल्याचे तपासणीत आढळले. (latest marathi news)

संशयित कापूस बियाणे पाकिटांसोबत डिलिव्हरी चलन, मालाचे पक्के बिल, ई-वे बिल नियमाप्रमाणे आढळले नाहीत. संशयित मालाची अनधिकृत वाहतूक झाल्याचे समोर आले. पंचांसमक्ष तपासणीत गोण्यांमध्ये संशयित कापसाचे बियाणे फायटर ५ जी, श्रीकॉट ४४ आढळले. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात संशयित व प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे उत्पादन व विपणन करणारी कंपनी, तिचे मालक व जबाबदार व्यक्ती, मोरे टूर्स ॲन्ड कार्गो, महेश व अशोक भाई या चौघांवर गुन्हा दाखल झाला.

कृषी सहसंचालक वाघ यांचे आवाहन

या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी आवाहन केले, की प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी जागरूक राहून बोगस बियाण्यांचा संशय आल्यास कृषी विभागाची संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

Nagpur Farmers Protest: ''कर्जमाफीचं काय ते बोला'' शिष्टमंडळाची बोलती बंद, मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा

SCROLL FOR NEXT