Fertilizer News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fake Fertilizers Case: 33 विक्रेत्यांचा परवाना निलंबित

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fake Fertilizers Case : येथील मोहाडी पोलिस ठाण्यात बनावट खत प्रकरणी गुन्हा दाखल आहे. यानंतर कृषी यंत्रणेने चौकशी सुरू केली.

त्यात कामकाजातील अनियमितता आणि बनवाट खताच्या पुरवठा केल्या प्रकरणी ३३ विक्रेत्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी पत्रकाद्वारे दिली. ‘सकाळ’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर कृषी यंत्रणा कामाला लागली. (Dhule Fake Fertilizers Case License of 33 sellers suspended)

ग्रीनफील्ड ॲग्रो केमिकल प्रा. लि. कंपनीचे उगम प्रमाणपत्र घाऊक परवान्यामध्ये समाविष्ट न करता भूमी क्रॉप सायन्स (धुळे) या अनधिकृत विक्रेत्यामार्फत जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांना अनधिकृत संशयित दाणेदार १८ः१८ः१० या मिश्रखताचा पुरवठा झाला. यात विक्रेत्यांनी तरतुदीचे उल्लंघन केल्याचे सुनावणीवेळी दिसून आले.

या पार्श्वभूमीवर सुनावणी अधिकाऱ्यांनी सोनगीर येथील लक्ष्मी ट्रेडर्सचा रासायनिक खत विक्री व घाऊक खत विक्री परवाना रद्द केला आहे.

तसेच जिल्ह्यातील इतर ३२ रासायनिक खत विक्रेत्यांनी भूमी क्रॉप, लक्ष्मी ट्रेडर्समार्फत ग्रीनफील्ड कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यामध्ये समाविष्ट न करता अनधिकृत संशयित दाणेदार मिश्रखताचा साठा शेतकऱ्यांना विक्री केल्याचे तपासणीत आढळले.

त्यामुळे त्यांचा तरतुदीनुसार पुढील आदेशापर्यंत विक्री परवाना निलंबित केल्याची माहिती श्री. तडवी यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रासायनिक खते विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक घडू नये यासाठी कृषी विभागाने चौकशीअंती कृषी केंद्रचालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी करताना कृषी निविष्ठा विक्री केंद्रातून बिलाची पक्की पावती घ्यावी. तसेच अनधिकृत असे काही आढळल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन श्री. तडवी यांनी केले.

"कृषी केंद्रचालकांनीही बोगस खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करू नये. असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जादा दराने विक्री किंवा इतर अनावश्यक खतांची लिंकिंग करीत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी ८२७५६३९४६८/९४०३४ १५६७५ या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन आहे."

-मोहन वाघ, कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT