Kishore Pawar esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule PSI Success Story: अंबोडा येथील शेतकरीपुत्र झाला ‘पीएसआय'; चिकाटी, आत्मविश्वासामुळे किशोर पवारची यशाला गवसणी

PSI Success Story : दोघा भावंडांचे प्रोत्साहन व डोळ्यासमोर आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव, गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले, अशा भावना किशोर व्यक्त करतो.

पी. एन. पाटील

नवलनगर : अंबोडा येथील शेतकरी अरुण पवार यांचा मुलगा किशोर पवार पोलिस उपनिरीक्षक झाल्याने परिसरात त्याचे कौतुक करण्यात येत आहे. (Amboda Kishore Pawar PSI Success Story)

किशोरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा अंबोडे, माध्यमिक, उच्च माध्यमिक पंडित नेहरू सह शेती विद्यामंदिर, नवलनगर व क्रांतिवीर नवलभाऊ महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण झाले. वडील अरुण शिवराम पवार, आई सिंधूबाई यांच्या कानावर मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्याचे वृत्त आल्यावर दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत थोड्या फरकाने अपयश मिळत होते. शेवटी पाच महिन्यांपूर्वी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात वर्ग ४ ची डेंटल असिस्टंट म्हणून नोकरी स्वीकारली होती.

भाऊ विजय पवार सीआयएसएफ, हनुमान अरुण पवार बीएसएफमध्ये कार्यरत असून, देशसेवा करीत आहेत. दोघा भावंडांचे प्रोत्साहन व डोळ्यासमोर आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव, गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाले, अशा भावना किशोर व्यक्त करतो. छत्रपती संभाजीनगर येथे अभ्यास, क्लाससाठी थांबला होता. (latest marathi news)

२०१७ पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांकडे वळाला. २०२० मुख्य परीक्षेत अपयश, २०२१ ला पूर्वपरीक्षेत अपयश, २०२२ च्या परीक्षेत यश मिळाले व पोलिस उपनिरीक्षकपदाचे स्वप्न साकार झाले. आई-वडील शेती करीत असल्यामुळे सर्व भावंडे त्यांना मदत करीत होती. नोकरी करून मैदानी व मुलाखतीची तयारी करत होता.

"डोळ्यासमोर आई-वडिलांचे कष्ट, भाऊ विजय व हनुमान यांचे प्रोत्साहन व स्वतःचा आत्मविश्वास, गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळे अपयशातून सावरत आज यश मिळाले. गेल्या पाच महिन्यांपूर्वीच वर्ग चारची नोकरी स्वीकारली होती. आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू माझ्या परिश्रमाची साक्ष देतात. स्पर्धा परीक्षेसाठी संयम ठेवणे आवश्यक असून, चिकाटी, आत्मविश्वास असला तर निश्चित यश मिळते." - किशोर पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT