Prof. Dinesh Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिरपूरच्या प्राध्यापकावर तऱ्हाडीजवळ गोळीबार

Dhule : बहिणीला भेटून घरी परतणाऱ्या प्राध्यापकावर दोन संशयितांनी गोळी झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १०) रात्री साडेदहाला तऱ्हाडी (ता. शिरपूर) गावाजवळ घडली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बहिणीला भेटून घरी परतणाऱ्या प्राध्यापकावर दोन संशयितांनी गोळी झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १०) रात्री साडेदहाला तऱ्हाडी (ता. शिरपूर) गावाजवळ घडली. या गोळीबारात प्रा. पाटील जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारानंतर धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या डॉ. पां. रा. घोगरे कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. दिनेश रमेश पाटील प्राध्यापक आहेत. ( Firing on Shirpur professor near Tarhadi )

ते भरवाडे (ता. शिरपूर) येथे राहतात. त्यांची बहीण सुलवाडे-सुलतानपूर (ता. शहादा) येथे राहते. तिला भेटण्यासाठी ते गेले होते. बहिणीकडून दुचाकीने ते घरी परत येत होते. तऱ्हाडी गावापासून एक किलोमीटरवर तोरखेडा (ता. शहादा) हद्दीत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही कळण्याच्या आतच दुचाकीवरील संशयिताने पिस्तुलातून त्यांच्यावर गोळी झाडली.

पाठीच्या खालील भागात गोळी शिरल्यामुळे प्रा. पाटील जखमी झाले. मात्र त्यांनी तशाही परिस्थितीत भरधाव दुचाकी चालवून तऱ्हाडीपर्यंत नेली. तेथे दुचाकी थांबवून त्यांनी ग्रामस्थांना हल्ल्याबाबत माहिती दिली. तऱ्हाडी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील त्यांचे सहकारी असल्याने त्यांना फोन करून माहिती दिली. प्रा. पाटील यांनी वाहनाची व्यवस्था करून जखमी पाटील यांना शिरपूरला आणले.

येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यांमध्ये जखमेनंतर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे आढळल्याने त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. किविप्र संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित फरारी

अंधार असल्यामुळे संशयित कोण होते, त्याबाबत प्रा. दिनेश पाटील काहीही सांगू शकले नाहीत. गोळी झाडल्यानंतर काही अंतर पाठलाग करून संशयित माघारी फिरले. त्यामुळे संशयितांचा हेतू लुटमारीचा नव्हता हे उघड आहे. प्रा. पाटील यांच्यावर कोणत्या कारणामुळे गोळीबार झाला, गोळीबार करणारे कोण होते, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT