Court Order esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : माजी नगराध्यक्ष पवारचा जामीनाबाबत अर्ज नामंजूर! पाटील पितापुत्र खून प्रकरणी खंडपीठात कामकाज

Dhule News : धुळे शहरात ८ जून २०१८ ला देवपूर परिसरात घडलेल्या रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पिता-पुत्राच्या खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील पाटील पितापुत्र दुहेरी खून खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यास प्रलोभन व धमकाविल्या प्रकरणी संशयित माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष पवार याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला आहे. धुळे शहरात ८ जून २०१८ ला देवपूर परिसरात घडलेल्या रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पिता-पुत्राच्या खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. (Dhule News)

दुहेरी खून खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. या दुहेरी खून खटल्यामधील मुख्य संशयित माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हरीश अनिल शिंदे यास खोटी साक्ष देण्यासाठी पैशांचे आमिष दाखविले होते. खोटी साक्ष देण्यासाठी धमकाविले होते म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिंदे याच्या फिर्यादीवरून संशयित बाजीराव पवार व त्याच्या अन्य साथीदाराविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आदेशाचे पालन नाही

या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली व मुख्य संशयित बाजीराव पवार याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्याचा औरंगाबाद खंडपीठाने गेल्या पाच महिन्यांपासून तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.

त्यासाठी खंडपीठाने मुख्य संशयित पवार यास गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिम कार्ड पोलिसांकडे जमा करायला लावले होते. परंतु, पवार याने या आदेशाचे पालन केले नाही. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिमकार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. (latest marathi news)

जामीन अर्ज नामंजूर

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पवार याने तपासावेळी सहकार्य केले नाही, असा अहवाल खंडपीठात सादर केला. त्यामुळे पवार याच्या जामीन अर्जावर पुन्हा १५ जुलैला औरंगाबाद खंडपीठात न्या. एन. बी. सूर्यवंशी यांच्यापुढे कामकाज चालले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्या. सूर्यवंशी यांनी मुख्य संशयित बाजीराव पवार याचा जामीन अर्ज नामंजूर केला.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. एस. बी. जाधव व फिर्यादीतर्फे अ‍ॅड. चैतन्य देशपांडे यांनी कामकाज पाहिले. या दुहेरी खून खटल्याचे पुढील साक्षीदार तपासणीसाठी २० जुलैला जिल्हा सत्र न्यायालयात कामकाज होण्याची शक्यता असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT