Municipal officials-employees while settling property tax arrears cases and implementing tax recovery process in National Lok Adalat in District Court. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule National Lok Adalat : महापालिकेच्या तिजोरीत चार कोटी! राष्ट्रीय लोकअदालनिमित्त शास्ती माफी योजनेतून वसुली

Latest Dhule News : या कालावधीत एकूण चार कोटी सहा लाख रुपये कर वसुली झाली. त्यामुळे लोकअदालतीचा कर वसुलीसाठी महापालिकेला थोडाफार का होईना दिलासा मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालमत्ता कराच्या वसुलीतून महापालिकेच्या तिजोरीत शनिवारी (ता.२८) ८४ लाख ७६ हजार रुपये जमा झाले. दरम्यान, लोकअदालतीच्या पार्श्‍वभूमीवर धुळे महापालिकेने ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान शंभर टक्के शास्ती माफी योजना राबविली. या कालावधीत एकूण चार कोटी सहा लाख रुपये कर वसुली झाली. त्यामुळे लोकअदालतीचा कर वसुलीसाठी महापालिकेला थोडाफार का होईना दिलासा मिळाला. (Dhule Four crores in municipal treasury)

मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करताना महापालिकेच्या यंत्रणेला नाकीनऊ येत आहेत. सुधारित कर आकारणीच्या नोटिसा वाटप झाल्यानंतर करात वाढ झाल्याची ओरड आहे. त्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर निवेदने, बैठका लावून कर आकारणीत दिलासा दिल्याचा मिळणार असल्याचा दावा केला.

त्यामुळे मालमत्ता कर वसुलीला ब्रेक लागला. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून कर वसुली थंडावली. मात्र, यावर्षी जुन्याच दराने कर वसुली होत असल्याने नागरिकांनी कर भरणा करावा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानंतरही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, राष्ट्रीय लोकअदालतीचे निमित्त साधून मनपा प्रशासनाने ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान मालमत्ता करावरील शास्तीत शंभर टक्के सूट जाहीर केली. या योजनेचा थोडाफार का होईना महापालिकेला फायदा झाल्याचे दिसते. (latest marathi news)

चार कोटी रुपये वसूल

शनिवारी (ता.२८) राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ३२५ थकबाकीदारांनी सहभाग नोंदवत मालमत्ता कर थकबाकी अदा केली. यातून महापालिकेच्या तिजोरीत ८४ लाख ७६ हजार ५४ रुपये जमा झाले. दरम्यान, शास्ती माफी योजनेच्या कालावधीत अर्थात ९ ते २७ सप्टेंबरदरम्यान दोन कोटी ९१ लाख ८२ हजार ३९४ रुपये कर वसुली झाली.

तर पाणीपट्टीपोटी २९ लाख ४२ हजार ७५५ रुपये वसूल झाले. त्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने दिलेल्या शास्ती माफी योजनेच्या एकूण कालावधीत मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी एकूण चार कोटी सहा लाख एक हजार २०३ रुपये जमा झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT