Fraud Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : फर्मची 61 लाखांत फसवणूक; धुळ्यात अकाउंटंटला अटक

Latest Crime News : या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित लेखापालाविरुद्ध (अकाउंटंट) गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Fraud Crime : खोट्या व बनावट स्वाक्षऱ्यांतून सेल्फ धनादेशाद्वारे भागीदारी फर्मची तब्बल ६१ लाखांत फसवणूक झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित लेखापालाविरुद्ध (अकाउंटंट) गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. (Firm defrauded of Rs 61 Lakhs)

या प्रकरणी चिरायू अनुप अग्रवाल (वय २२, रा. प्लॉट क्रमांक १८, अग्रवालनगर, धुळे) याच्या फिर्यादीनुसार १ एप्रिल ते ३० सप्टेंबर यादरम्यान वेळोवेळी चिरायू ट्रेडर्स भागीदारी फर्मच्या धुळे विकास सहकारी बँक (गरुडबाग शाखा) येथील चालू खात्यातून भागीदारी फर्मचा अकाउंटंट नीलेश कचरूलाल अग्रवाल (रा. भाईजीनगर, धुळे) याने त्याच्या ताब्यातील बँकेच्या फर्मच्या खात्याच्या धनादेश पुस्तकाचा दुरुपयोग केला.

धनादेशावर त्याने चिरायू अग्रवाल याच्या खोट्या व बनावट स्वाक्षऱ्यांतून सेल्फ चेकद्वारे एकूण ६१ लाख परस्पर काढून घेतले. तसेच ते स्वतःसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वापरून फसवणूक केली. भागीदारी फर्मच्या रकमेचा अपहार केला. त्यानुसार संशयित नीलेश अग्रवाल याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT