Chloral Hydrate esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Chemical Tadi Crime: केमिकलयुक्त ताडीचा ‘गोरखधंदा’! शिंदखेडा तालुक्यात आंध्रप्रदेशातील यादगिरीची ‘ताडीगिरी’

Crime News : या अवैध ताडी विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कानाडोळा केल्याने आंध्रप्रदेशातील ‘यादगिरी आण्णाची’ ताडी विक्रीतील दादागिरी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Chemical Tadi Crime : शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा व दोंडाईचा येथे ताडी विक्री केंद्राचे शासकीय परवाने दिले आहेत. मात्र, केमिकलयुक्त ताडी विक्रीची अनेक केंद्र तालुक्यात थाटले आहेत. या अवैध ताडी विक्रीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कानाडोळा केल्याने आंध्रप्रदेशातील ‘यादगिरी आण्णाची’ ताडी विक्रीतील दादागिरी वाढली आहे.

तालुक्यातील तरूण ‘क्लोरल हायड्रेट’ केमिकलयुक्त ताडीचे व्यसनाधिन झाल्याने काहींनी या जगाचा निरोप घेतला. तर काही तरूण मृत्यूशी झुंज देत आहेत. संबंधित ताडी विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग कारवाई करेल का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिंदखेडा तालुक्यात ‘क्लोरल हायड्रेट’ केमिकलयुक्त ताडीची विक्री शहरासह तालुक्यातील खेड्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. या गोरखधंद्यात आंध्रप्रदेशातील ‘यादगिरी आण्णाने’ तालुक्यात चांगलाच जम बसविल्याने मध्यम, वयस्करांसह तरूण वर्ग या ताडीकडे आकर्षित झाल्याने केमिकलयुक्त ताडीची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.

अनेक तरूणांचा मृत्यू

शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केमिकलयुक्त ताडीमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. अनेक तरूणांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने ते अंथरूणावर खिळून आहेत. केमिकलयुक्त ताडीविरोधात लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी आवाज उठवून तालुक्यातून केमिकलयुक्त ताडी हद्दपार केली पाहिजे. या ताडीच्या आहारी गेलेल्यांना आरोग्याशी संबंधित सेवाभावी संस्थांनी प्रबोधन केले पाहिजे. (latest marathi news)

उत्पादन शुल्क व अन्न-औषधकडून कारवाई नाही

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि शिंदखेडा, दोंडाईचा व नरडाणा पोलिसांनी तालुक्यातील गावांमध्ये बिनबोभाट सुरू असलेल्या केमिकलयुक्त ताडी विक्री केंद्रावर कारवाई केली गेली पाहिजे. तसेच, अन्न व औषध प्रशासनाने शिंदखेडा व दोंडाईचा येथील परवानाधारक ताडी विक्री केंद्रावरील ताडीचे नमुने घेवून ते नमुने उच्च प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायला हवे, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

१५ ऑगस्टच्या तारखेला होता ज्योतिषांचा विरोध, मग नेहरूंनी काढला तोडगा.. वाचा नेमका किस्सा...

Nanded News : मेरिट योजनेत एसजीजीएस अभियांत्रिकी संस्थेची निवड; १८ कोटींचे आर्थिक सहाय्य

MBBS and BDS Admission : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अंतिम तारीख १५ ऑगस्ट

SCROLL FOR NEXT