Villagers making their way through rocks and stones after the road was washed away in the first rain of Kuylidabar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Heavy Rain Damage : सर आली धावून, रस्ता गेला वाहून! कुयलीडाबर येथील प्रकार; ग्रामस्थांचे हाल

Dhule News : पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असे बोलले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या तळोदा तालुक्यातील कुयलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षभरापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले होते. मात्र पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असे बोलले जात आहे. (Dhule Heavy Rain Damage incident at Cuylidabar)

तळोदा तालुक्यातील कुयलीडाबर हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले अतिदुर्गम भागातील सुमारे ३०० लोकसंख्या असणारे गाव आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या गावाला जोडणारा पक्का रस्ता अद्यापपर्यंत नव्हता. त्यामुळे या गावातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. गावात जाण्यासाठी तब्बल चार ते पाच किलोमीटर पायपीट करून जावे लागते.

रस्ता नसल्याने या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गावात रस्ता व्हावा ,अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः याबाबत लक्ष घालून रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम हाती घेतलेले होते. त्याअंतर्गत रस्ता तयार झाला होता. मात्र तयार रस्ता एकाच पावसात वाहून गेला आहे. (latest marathi news)

तत्काळ दुरुस्तीची मागणी

रविवारी (ता.२३) रोजी तळोदा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कुयलीडाबर (ता. तळोदा) या ठिकाणीही चांगला पाऊस झाला. मात्र या पावसात कुयलीडाबर गावाला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला.

जेमतेम तयार झालेला रस्ताही वाहून गेल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना रहदारीला त्रास होणार आहे. रस्त्याच्या वरचा थर वाहून गेल्याने आता फक्त लहान मोठे दगड उरले आहेत. त्यामुळे अशा रस्त्यावर वाहन चालविणे ग्रामस्थांना मोठ्या मुश्किलीचे होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT