Heavy rain in city esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Heavy Rain Update : दोन दिवस धुव्वाधार बॅटींग! परतीच्या पावसाचा आणखी दोन दिवस मुक्काम

Latest Dhule News : चार दिवसांपासून पावसाचा जोर आहे. पुढील दोन दिवस हा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहर व परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह २४ सप्टेंबरला रात्री तसेच २५ सप्टेंबरला दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर आहे. पुढील दोन दिवस हा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. (heavy rain for two days)

मध्यरात्रीच्या सुमारास शहरासह नगाव, धमाणे, कापडणे, देवभानेसह (ता. धुळे) परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यात ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाट धडकी भरविणारा होता. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. देवपूर भागातील सुशीनाल्याला पूर आला. जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील दोन ते तीन फरशी पुलावरून पाणी गेले. त्या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आली.

कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेत २४ सप्टेंबरला ३०.२ मिलीमीटर, तसेच बुधवारी १२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५८०.०५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु राहिल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. त्यातच काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धरणातून पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. बुधवारी पहाटे तीनला तीन गेट उघडण्यात आले. त्यातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदीपात्रात सोडण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT