Amit Shah esakal
उत्तर महाराष्ट्र

Amit Shah Dhule Sabha : गृहमंत्री अमित शहांची सोमवारी धुळ्यात सभा! डॉ. सुभाष भामरे यांचा प्रचार

Dhule News : सभेला उपस्थितीचे आवाहन उमेदवार डॉ. भामरे यांच्यासह भाजप महायुतीने केले.

सकाळ वृत्तसेवा

Amit Shah Dhule Sabha : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. १३) सकाळी अकराला येथील मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभेला उपस्थितीचे आवाहन उमेदवार डॉ. भामरे यांच्यासह भाजप महायुतीने केले. (dhule Home Minister Amit Shah meeting in Dhule)

लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २० मेस मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या सभेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगाव, बागलाण, धुळे जिल्ह्यातील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षांचे आजी-माजी आमदार, जिल्हा व शहरप्रमुख, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित असतील. (latest marathi news)

मल्लिकार्जुन खर्गे उद्या शिंदखेड्यात

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची रविवारी (ता. १२) दुपारी दोनला शिंदखेडा येथे जाहीर सभा होणार आहे. शेतकरी बोर्डिंग, शिंदखेडा संस्थेचे किसान विद्यालयात सभा होणार आहे.

काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेंनीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख अशोक धात्रक, लोकसंग्रामचे अध्यक्ष अनिल गोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कप्रमुख उमेश पाटील उपस्थित असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT