A cut tree of Maharukh variety near Shemalya village on Palasner-Boradi road. Forest employee Sunita Pawra while inspecting it esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Tree Cutting : सातपुडा जंगल परिसरात अवैध वृक्षतोड सुरूच; वन अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी

Tree Cutting : शिरपूर तालुक्यातील वन विभागातील सांगवी नवक्षेत्रात मोठ्या झाडांची अवैध वृक्षतोड केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Tree Cutting : शिरपूर तालुक्यातील वन विभागातील सांगवी नवक्षेत्रात मोठ्या झाडांची अवैध वृक्षतोड केली जात आहे. ही एक महिन्यातील वृक्षतोडीची दुसरी घटना समोर आली आहे. वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे संतापजनक चित्र पाहावयास मिळत आहे. शिरपूर तालुक्यातील सातपुडा परिसरात आदिवासी भागातील खुलेआम वृक्षांची कत्तल होत असताना वृक्षसंपदेची मोठी हानी होत असल्याचे वृक्षप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. (Illegal tree cutting continues in Satpura forest area )

पळासनेर-बोराडी रस्त्यावरील शेमल्या गावाजवळ रस्त्यावर कालपरवापर्यंत डौलदारपणे जंगलात उभी असलेले हे परिपक्व महारुख जातीचे वृक्ष सोमवारी (ता. १५) रात्री तस्करांनी बुडापासून कटर मशिनने कापून ठेवले आहेत. १६ जुलैला सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर वनकर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आले, की शेमल्या परिसरात वृक्षतोड झाल्याचे कळल्यावर वनकर्मचारी घटनास्थळी हजर झाले; परंतु रात्री झाडांची कत्तल केल्यामुळे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. कापलेले झाडाचे लाकूड सांगवी वन विभागाने ताब्यात घेतले असून, वन विभाग कार्यालयात जमा करण्यात आले आहे. (latest marathi news)

कायद्याची पायमल्ली?

स्वमालकीच्या जागेवरील वृक्षतोड करण्यासाठी परवानगी लागते. त्यासाठी अर्ज केल्यावर वनपाल, वनक्षेत्रपाल घटनास्थळी जाऊन वृक्षांचे मूल्यमापन करतात. त्यानुसार परवानगी दिली जाते. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. सरकारने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेऊन अंमलबजावणीही केली. संबंधित विभागाकडून गावोगावी समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, त्या कागदावरच आहेत. तालुक्यात वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड करणाऱ्यांची चांगली चांदी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT