Forest department team with seized timber and machinery. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वन विभागाच्या कारवायांमध्ये सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : वन विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून वाहन, लाकूड आणि यंत्रसामग्री मिळून दोन लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील वन विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून वाहन, लाकूड आणि यंत्रसामग्री मिळून दोन लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. लाकडांची चोरटी वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून २७ मेस वन विभागाच्या पथकाने अर्थे-वाघाडी रस्त्यावर सापळा रचला होता. संशयित पिक-अपला थांबवून झडती घेतली असता लिंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. ()

या कारवाईत पथकाने पिक-अप आणि लाकूड असा एकूण एक लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईदरम्यान मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत दहिवद (ता. शिरपूर) येथे किरण फर्निचर या दुकानावर पथकाने छापा टाकला. तेथे लाकडापासून विनापरवाना फर्निचर तयार करीत असल्याचे आढळले.

घटनास्थळावरून वन विभागाने १२ इंच रंधा मशिन, कटर मशिन, सागवान जुन्या लाकडापासून तयार केलेले दरवाजे, चौकटी व इतर कट साइझ सागवानाचे सव्वा घनमीटर लाकूड असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे प्रादेशिक वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी दक्षता सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल के. डी. देवरे, वनपाल आर. ई. पाटील, दीपिका पालवे, भारती राजपूत, वनरक्षक मनोज पाटील, कृष्णकांत साळुंखे, ज्योतिबा कांदे, राहुल देसले, विजय शिंदे, सोनल मगरे, भारती पावरा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

Junnar Rains: जुन्नर शहर व आदिवासी पट्ट्यात मुसळधार पावसाचा तडाखा; रस्ते खड्डेमय, इंगळून घाटात राडारोड्यामुळे अडथळा

Vaibhav Sooryavanshi ने सचिनचा विक्रम मोडला, पण विश्वविक्रम राहिला दूर; पाहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा ५ खेळाडू

Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसाचा 'बेस्ट'ला मोठा फटका; मुंबईतील अनेक बसमार्ग बदलले, सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT