Former Minister MLA Jaykumar Rawal while inaugurating the ambulance
Former Minister MLA Jaykumar Rawal while inaugurating the ambulance esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेडा शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण; आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील काकाजी मंगल कार्यलयातील कार्यक्रमात शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते तथा माजी नगरसेवक अनिल वानखेडे यांच्या स्वखर्चातून तयार करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी रोहयो व पर्यटनमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.

या वेळी भाजपा गट अनिल वानखेडे, तहसीलदार ज्ञानेशवर सपकाळे, मुख्याधिकारी प्रशांत बेडेकर, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील. (Dhule Inauguration of Ambulance for Shindkheda City)

उल्हास देशमुख, युवराज माळी, धुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे, भाजप शहराध्यक्ष विनोद पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज दिसले, भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी आदी उपस्थित होते. श्री. वानखेडे यांच्या स्वखर्चाने रुग्णावाहिका शहरातील नागरिकांसाठी ‘पेट्रोल-भरा’ या तत्त्वावर उपलब्ध होणार आहे.

याअगोदर शिंदखेडा शहरासाठी त्यांनी डिसेबर २०१२ मध्येदेखील रुग्णावाहिका उपलब्ध करून दिली होती. मागील दोन वर्षांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून शहरासाठी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणीदेखील रुग्णवाहिका देण्यात आली आहे. (latest marathi news)

परंतु शिंदखेडा शहराचा वाढता विस्तार पाहता शहरासाठी आणखी एका रुग्णवाहिकेची कमतरता बऱ्याच दिवसांपासून जाणवत होती. शहरासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून शहरातील जनतेसाठी आजपासून रुग्णावाहिका वापरता येणार आहे.

कार्यक्रमप्रसंगी चेतन परमार, उदय देसले, अर्जुन भिल, किसन सकट, अरुण देसले, बाळासाहेब गिरासे, राजू पहाडी, दगा चौधरी, भगवान मराठे, रमेश भामरे, प्रकाश चौधरी, बन्सी बोरसे, दिनेश सूर्यवंशी, प्रवासी दादा मराठे, जयसिंग राजपूत, रणजित गिरासे, प्रा. मधुकर मंगळे, बिपीन पाटील, मिलिंद पाटोळे, अबू कुरेशी, गुलाब सोनवणे यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT