garbage truck esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : प्रत्येक घंटागाडीला 4 ट्रिपचे बंधन; 1 मेपासून कार्यवाही सुरू

Dhule : शहरात पडलेला कचरा रोजच्या रोज उचलला जावा, घरोघरी दररोज कचरा संकलन व्हावे यासाठी प्रत्येक घंटागाडीने रोज किमान चार ट्रिप (फेऱ्या) कचरा संकलनाचे बंधन घालण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात पडलेला कचरा रोजच्या रोज उचलला जावा, घरोघरी दररोज कचरा संकलन व्हावे यासाठी प्रत्येक घंटागाडीने रोज किमान चार ट्रिप (फेऱ्या) कचरा संकलनाचे बंधन घालण्यात आले आहे. १ मेपासून ठेकेदाराकडून घंटागाडीचालक, कामगारांना ही सक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी प्रत्येक घंटागाडीला तीन ट्रिपचे बंधन होते. या नव्या नियमामुळे आता शहरात कचरा दिसणार नाही, घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. (Dhule Limit of 4 trips per hour for garbage truck)

शहरातील कचरा संकलनाचे काम स्वयंभू कन्स्ट्रक्शन (पुणे) या कंपनीला देण्यात आले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ असेपर्यंत कचरा संकलनाबाबत नेहमीच तक्रारी असायच्या. आज या तक्रारी कमी झाल्या असल्या तरी समस्या मिटली, असे म्हणता येत नाही. आजही कचरा संकलनाची समस्या, शहरात सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. ही समस्या दूर व्हावी, शंभर टक्के कचरा संकलन करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. याबाबत नुकतीच बैठकदेखील झाली. (latest marathi news)

चार ट्रिपचे बंधन

महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांच्याकडे बैठक झाल्यानंतर स्वयंभू कंपनीकडून घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना रोज चार ट्रिप मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी तीन ट्रिपचे बंधन होते. मात्र, रोज शंभर टक्के कचरा संकलन होत नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने स्वयंभूकडून १ मेपासून घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना चार ट्रिपचे बंधन घालण्यात आले आहे.

प्रत्येक घंटागाडी दिवसभरात ठरवून दिलेल्या प्रभागातून चार ट्रिप कचरा संकलन करून तो डेपोवर नेईल. यामुळे त्या-त्या प्रभागातून शंभर टक्के कचरा संकलन होईल, अशी अपेक्षा आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेकडून ठेकेदाराला ६९ घंटागाड्या पुरविल्या आहेत. यातील किमान ६०-६५ घंटागाड्या रोज चालतात असा अंदाज आहे. हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील या घंटागाड्या कचरा संकलन करतात. प्रभागांमधून रोज डोअर-टू-डोअर कचरा संकलन व्हावे यासाठी केलेल्या या नियोजनातून तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT