Police extricating the buried body of the girl. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चिमुरडीचा खून करून मृतदेह पुरला, बापाला अटक

Dhule : तीन वर्षीय चिमुरडीचा खून करून घराजवळ मृतदेह पुरल्याच्या संशयावरून तिच्या बापाला शहर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तीन वर्षीय चिमुरडीचा खून करून घराजवळ मृतदेह पुरल्याच्या संशयावरून तिच्या बापाला शहर पोलिसांनी अटक केली. शनिवारी (ता.८) या घटनेस वाचा फुटली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून संशयित बापाला अटक केली आहे. नांदर्डे (ता. शिरपूर) येथे ही घटना घडली. पूजा अनिल पावरा असे मृत बालिकेचे नाव असून तिचे वडील अनिल गुलाब पावरा खुनातील प्रमुख संशयित आहे. ( Little girl was killed and body buried by father )

सहा जूनला रात्री मद्याच्या नशेत त्याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घाव घालून तिचा खून केला व पहाटे मृतदेह घरामागे मोकळ्या जागेत पुरल्याचा संशय आहे. पोलिस पाटील पंकज पावरा यांनी माहिती देताच प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिली. मृत पूजाचा मृतदेह उकरून काढण्यात आला.

अशी फुटली वाचा

पूजा ही अनिल पावराच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी होती. तिची आई पतीला घटस्फोट देऊन निघून गेली आहे. त्यानंतर अनिलने दुसरे लग्न केले. मात्र दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. अनिलच्या शेजारी त्याचे नातलग राहतात. त्यांच्या घरी पूजाचे येणे-जाणे होते. दोन दिवसांपासून ती दिसत नसल्यामुळे त्यांनी अनिलकडे चौकशी केली.

त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिस पाटील पंकज पावरा यांना ही बाब सांगितली. पावरा व अन्य नातलगांनी दरडावून विचारणा केल्यावर अनिलने आपण पूजाचा खून करून मृतदेह पुरल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT