Dhule Lok Sabha Election Inquiry if found more than 50 thousand esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election : 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम आढळल्यास चौकशी; उल्लंघन झाल्यास कारवाई

Dhule News : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या बेसुमार खर्चाला निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेंतर्गत लगाम घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या बेसुमार खर्चाला निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेंतर्गत लगाम घातला आहे. केवळ ९५ लाख रुपये प्रचारावर खर्च करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारावरील खर्चात हात आखडता घ्यावा लागणार आहे. ९५ लाखांच्या पुढे खर्च गेल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई होणार आहे. (Dhule Lok Sabha Election Inquiry if found more than 50 thousand)

सामान्य नागरिकांनाही आता निवडणूक काळात स्वत:जवळ ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगता येणार नाही. तपासणीत ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळली, तर संबंधितांना त्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत, अशी माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली. निवडणूक काळात मतदारांना पैसे दिल्याच्या तक्रारी येतात.

वाहनातून पैसे ने-आण केल्याचेही आरोप होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली आहेत. संशयास्पद वाहनांची व व्यक्तींची तपासणी ते नियमितपणे करतील. एखाद्या वाहनात दहा लाखांपर्यंत रक्कम आढळल्यास त्याची चौकशी होईल. मात्र, तेवढी रक्कम वाहून नेताना त्या वाहनातील व्यक्तीकडे त्या पैशासंदर्भातील कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. (Latest Marathi News)

दहा लाखांहून अधिक रक्कम आढळल्यास त्याची शहानिशा पोलिसांमार्फत होईल. तसेच त्या रकमेची माहिती प्राप्तिकर विभागाला कळविली जाईल. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मेस मतदान होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २६ एप्रिलला प्रसिद्ध झाली. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३ मे आहे.

नामनिर्देशनपत्राची छाननी ४ मेस होईल. ६ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० मेस मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होईल. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा अंतर्भाव आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपासून मतदानापर्यंत प्रचारासाठी महिनाभराचा कालावधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident:'टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अपघातात २ मजुरांचा मृत्यू'; अज्ञात वाहनाची धडक, हातावर पोट अन्..

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग होस्टेलच्या व्यवहारातील २३० कोटींची गोठवा- रविंद्र धंगेकर

Pune Weather Update: पुण्यात पुन्हा सरींचा हल्ला! पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Pandharpur Kartiki Yatra: पंढरपूर कार्तिकी यात्रेसाठी ११५० जादा बस; वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज; उद्यापासून ६ नोव्हेंबरपर्यंत सेवा

Solapur Municipal Corporation: बिल्डरांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करा; आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जनता दरबारात दाद

SCROLL FOR NEXT