Administrator Amita Dagde-Patil speaking in the Administrative Committee of the Municipal Corporation. Neighbors Karuna Dahale, Manoj Wagh and officers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : L&T ‘आउट', जयंतीसुपरला ‘कॉन्ट्रॅक्ट’! मलनिस्सारण टप्पा दोनची 688 कोटींची निविदा मनपातर्फे मंजूर

Latest Dhule News : निवडणूक आचारसंहितेमुळे बीड व्हॅलिडीटी संपल्याने फेरनिविदा काढण्यात आली. याबाबत एल अॅन्ड टी कंपनी न्यायालयातही गेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : केंद्र, राज्य सरकार पुरस्कृत अमृत-२.० योजनेंतर्गत धुळे शहर मलनिस्सारण योजना (टप्पा-२) योजनेचे काम जयंतीसुपर कन्स्ट्रक्शन प्रा. ली. या कंपनीला देण्यास अर्थात या कंपनीची सर्वांत कमी दराची निविदा महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने मंजूर केली. वाटाघाटीअंती १६.४९ टक्के जादा दराची कंपनीची निविदा होती.

त्यामुळे एकूण ६८८ कोटी ८२ लाख रुपये खर्चातून हे काम होईल. याच प्रकल्पासाठी यापूर्वी लार्सन अॅन्ड टूर्बो प्रा. ली. कंपनीची निविदा पात्र ठरली होती. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे बीड व्हॅलिडीटी संपल्याने फेरनिविदा काढण्यात आली. याबाबत एल अॅन्ड टी कंपनी न्यायालयातही गेली आहे. (Jayanthi Super get Contract sewerage phase two by Municipal Corporation)

महापालिकेची प्रशासकीय स्थायी समितीची सभा दुपारी पावणेतीनला मनपा सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ व अधिकारी उपस्थित होते.

फेरनिविदेची सूचना

अमृत-२.० अंतर्गत धुळे शहरासाठी (देवपूर वगळता) मलनिस्सारण योजना मंजूर झाली. यात ७१७.१२ कोटींच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक, तर ७१४.५१ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली. नंतर या योजनेसाठी महापालिकेकडून ५९१.३१ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली. निविदेचा वित्तीय लिफाफा १६ मार्चला उघडण्यात आला. त्यात लोकसभा निवडणूक, विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली.

ती संपल्यानंतर मनपाच्या पहिल्या प्रशासकीय स्थायी समितीपुढे या निविदेचा प्रस्ताव सादर झाला. निविदेचा बीड व्हॅलिडीटी कालावधी संपल्यामुळे फेर ई-निविदा काढणे किंवा काय, याचा निर्णय घेण्याबाबत नगरविकास प्रधान सचिव (नवि-२) तथा राज्यस्तरीय तांत्रिक समिती अध्यक्षांकडे (अमृत अभियान) तो सादर करण्याचा ठराव पारित झाला. त्यावर राज्यस्तरीय तांत्रिक समितीने या प्रकल्पासाठी फेरनिविदा काढण्याचे सूचित केले.

प्रकरण न्यायालयात

फेरनिविदेच्या निर्णयानंतर एल अॅन्ड टी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हानाची रिट याचिका दाखल केली. याप्रकरणी ३० ऑगस्टला न्यायालयाने नव्याने निविदाप्रक्रिया चालू ठेवता येऊ शकेल. मात्र, ही प्रक्रिया रिट याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून असेल, असे आदेशात नमूद केले. (latest marathi news)

फेरनिविदा मंजूर

न्यायालयाच्या सूचनेचा संदर्भ घेत महापालिकेने फेरनिविदा काढली. ९ सप्टेंबरला या निविदांचा तांत्रिक लिफाफा उघडण्यात आला. यात जयंतीसुपर कन्स्ट्रक्शन, दिनेशचंद्र आर. अग्रवाल व ईगल इन्फ्रा इंडिया लि. या तीन निविदाधारकांनी भाग घेतला. यातील मे. जयंतीसुपक कन्स्ट्रक्शनची सर्वांत कमी दराची (शे. १७ टक्के जास्त) निविदा होती.

वाटाघाटीअंती कंपनीने शे. ०.५१ टक्के कमी केले. त्यामुळे १६.४९ टक्के कमी दराची ही निविदा स्थायी समितीने मंजूर केली, तसेच हा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता राज्यस्तरीय समिती यावर अंतिम निर्णय घेईल.

धुळे मनपा : मलनिस्सारण टप्पा-२ योजना (आकडे कोटीत)

- तांत्रिक मंजुरी...........................................७१७.१२

- प्रशासकीय मंजुरी.......................................७१४.५१

- निविदा प्रसिद्ध..........................................५९१.३१

- मे. जयंतीसुपरची निविदा......६९१.८३ (१७ टक्के जादा दराने)

- वाटाघाटीअंती दर कमी..............................०.५१ टक्के

- निविदा मंजूर....................६८८.८२ (१६.४९ टक्के जादा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT