Artists presenting art at the Mahasanskrit festival  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप

Dhule : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासनातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी रात्री पाच दिवसीय रंगतदार महासंस्कृती महोत्सवाचा समारोप झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासनातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी रात्री पाच दिवसीय रंगतदार महासंस्कृती महोत्सवाचा समारोप झाला. यात देशभक्तीपर गीत, अहिराणी लोकगीतांसह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाने महासंस्कृती महोत्सवाचा चौथा दिवस गाजविला. (Dhule Mahasanskruti Mahotsav concludes)

येथील गंधार वाद्यवृंदाने ‘रंग दे बसंती’ कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांनी वातावरणात स्फुरण आणले. मेरा रंग दे बसंती छोला, मॉ तुझे सलाम, वंदे मातरम्, ऐसा देश हे मेरा याबरोबरच शिवनेरीवर शिव जन्मला दैवंत आमचा छत्रपती आमचं दैवत या शौर्य गीते व पोवाड्यांनी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

शाहीर श्रावण वाणी यांच्या अहिराणी लोकगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रा. गणेश शिंदे व सन्मिता शिंदे (पुणे) यांच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन चरित्रावर आधारित ‘मोगरा फुलला’या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मसोहळ्यापासून ते समाधी सोहळ्यापर्यंचे वर्णन गीतांतून सादर केले. (latest marathi news)

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळा प्रसंगाचे वर्णन ऐकून उपस्थित श्रोत्यांच्या कडा पाणावल्या. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार.

निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, संदीप पाटील, सीमा अहिरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhanath Temple : आटपाडीत सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील २४ किलो चांदी गायब, दुरुस्तीच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

Bribery Action: साेलापुरात महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; ऑनलाइन मंजुरीसाठी मागितले तीन हजार, जिल्ह्यात खळबळ!

कोर्टाच्या दणक्यानंतर धाबे दणाणले, शिंदेंसह अजितदादांचे पदाधिकारीही पोलिसांसमोर शरण; १३ जणांना अटक

Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT