dhule dangal imege 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात पाच हजार संशयितांविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

धुळे ः"सीएए', "एनआरसी' आणि "एनपीआर' कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने बुधवारी (ता. 29) पुकारलेल्या "बंद'ला धुळे शहरासह शिरपूरला हिंसक वळण लागले. यात शहरात दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली. या प्रकरणी येथील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चार ते पाच 
हजार समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आतापर्यंत दहा संशयितांना अटक केली. दरम्यान, संशयितांचा शोध व अटकेची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. तसेच संवेदनशील शंभर फुटी रोड परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असून, स्थिती पूर्वपदावर आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी दिली. 


पाच हजार जणांवर गुन्हा दाखल 
चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणासह शासकीय कामात अडथळा व विविध कलमांन्वये धुळ्यातील चार ते पाच हजार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 


"एलसीबी'कडे तपास 
चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयितांपैकी आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. यात हारून रफिक खाटीक, शाहरुख अब्बास खाटीक, सय्यद हबीब सय्यद इब्राहिम, रफीक गुलाब शेख, फिरोज नसीरखान, तौसिफ रज्जाक शेख, आसिफ शाह गोलू शाह, शाहरुख मणियार, राहुल वाघचा समावेश आहे. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT