Municipal employees carrying out cleaning duties at the police training ground during the marathon on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon: स्वच्छता पाळा-निरामय आयुष्य जगा! महापालिका पथकाचा कृतीतून संदेश; मॅरेथॉनपूर्वी रात्री 2 पर्यंत स्वच्छता

‘फिट धुळे-हिट धुळे’ हे घोषवाक्य घेऊन व ‘रन फॉर पांझरा’ ही थीम घेऊन रविवारी (ता. ४) शहरात धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन-२) स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : ‘फिट धुळे-हिट धुळे’ हे घोषवाक्य घेऊन व ‘रन फॉर पांझरा’ ही थीम घेऊन रविवारी (ता. ४) शहरात धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन-२) स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली.

आरोग्यदायी जीवनासाठी व्यायामाचा संदेश घेऊन या उपक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धक, नागरिकांना महापालिकेच्या स्वच्छता विभागाने निरामय आरोग्यासाठी स्वच्छता पाळा असाही संदेश दिला. तो महापालिकेने कृतीतून दाखवून दिला. (Dhule Marathon Keep Clean Live Healthy Life Municipal team message in action)

घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना मॅरेथॉनचे टी-शर्टवाटप करताना उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर.

मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिका सार्वजनिक स्वच्छता विभागाची टीम शनिवारी (ता. ३) रात्रीपासूनच राबत होती. रात्री दोनपर्यंत मॅरेथॉन मार्गासह पोलिस मैदानावर स्वच्छता केल्यानंतर मॅरेथॉननंतरही कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉन मार्गासह पोलिस मैदान चकाचक केले.

धुळे मॅरेथॉन-२०२४ (सीझन-२) साठी महापालिकेची टीमही उपाययोजनांसाठी सक्रिय होती. विशेषतः स्वच्छतेच्या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले.

मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी सार्वजनिक स्वच्छता विभागाला स्वच्छतेसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्या नेतृत्वात अधिकारी-कर्मचारी कामाला लागले. ४ फेब्रुवारीला पहाटे चार-पाचपासूनच मॅरेथॉनची गजबज सुरू होईल हे लक्षात घेऊन महापालिकेने शनिवारी रात्री दहापासूनच मॅरेथॉन मार्गासह पोलिस कवायत मैदानावर स्वच्छतेचे काम हाती घेतले.

रात्री दोनपर्यंत कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले. पोलिस मैदानासह परिसरात अग्निशमन बंबाने पाणीही मारण्यात आले. त्यामुळे पोलिस मैदानासह मॅरेथॉन मार्गावर स्वच्छता पाहायला मिळाली. उपायुक्त डॉ. नांदूरकर यांनी रात्रीच स्वच्छतेच्या या कामाची पाहणी केली.

शिवाय घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना मॅरेथॉन स्पर्धकांसाठी बनविलेल्या टी-शर्टचेही वाटप केले. तसेच मॅरेथॉन मार्गावर मोकाट जनावरांमुळे अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जनावरांचाही बंदोबस्त करण्यात आला.

मैदानावरही टापटीप

पोलिस मैदानावरही स्वच्छतेसाठी महापालिकेने उपाययोजना केल्या होत्या. तेथे लावलेल्या प्रत्येक स्टॉलवर डस्टबिन ठेवण्यात आले. तसेच रात्रीच मैदानावर १५ घंटागाड्या व पाच ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली.

हजारो स्पर्धकांनी गजबजलेल्या मैदानावर स्वच्छता ठेवण्यासाठी पोलिस मैदानावर सुमारे ३०० सफाई कर्मचारी तैनात होते. स्पर्धा संपल्यानंतर लगेचच या कर्मचाऱ्यांनी पोलिस मैदान स्वच्छतेतून चकाचक केले.

उपायुक्त डॉ. नांदूरकर यांच्या नेतृत्वात मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, संदीप मोरे, साईनाथ वाघ, गजानन चौधरी, चेतन अहिरे, चंद्रकांत जाधव, संदीप वाघ, आसिफ बेग, अख्तर शेख, एजाज शेख, मनीष आघाव, रूपेश पवार, शुभम केदार, प्रमोद चव्हाण, रतन निरगुडे यांच्यासह मुकादम, सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT