At present, the last stage of marriage has started and before the marriage, the bridegroom carries the deity in the traditional way. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lagna Muhurat : उर्वरित मुहूर्तावर विवाहेच्छुकांची लगीनघाई! आषाढी एकादशीपर्यंत तिथी; मे मध्ये होता गुरूचा अस्त

Dhule News : आता जुळलेले अन राहिलेले विवाह मे महिन्यात गुरूचा अस्त असल्याने झाले नाहीत. मात्र जून महिना सुरू असल्याने आता विवाह लावण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

जगन्नाथ पाटील

कापडणे : गेल्या नोव्हेंबरपासून ते १५ जुलैपर्यंत एकसष्ट विवाह मुहूर्त आहेत. आता शेवटच्या टप्प्यातील विवाहांची लगीनघाई सुरु झाली आहे. सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे. तेव्हापासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाह विवाह ठप्प होतात. मुहूर्त नसतात. आता जुळलेले अन राहिलेले विवाह मे महिन्यात गुरूचा अस्त असल्याने झाले नाहीत. मात्र जून महिना सुरू असल्याने आता विवाह लावण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. (Dhule Marriage aspirants rush for rest of muhurat)

नोव्हेंबरमध्ये कार्तिकी एकादशी झाली. अन २९ नोव्हेंबरपासून विवाहाचे बार फुटले. आता पंधरा जुलै हा शेवटचा मुहूर्त आहे. सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानंतर विवाह मुहूर्त नसतात. तसेच खानदेशी मंडळी शेती कामात व्यस्त होतात. आता उरलेल्या मुहूर्तावर विवाह लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मे महिन्यापासून ते जूनच्या अर्ध्या महिन्यापर्यंत गुरूचा अस्त होता. या काळात विवाह तिथी नव्हत्या. मे महिन्याची उन्हाळी सुटी असूनही नोकरवर्गाची गैरसोय झाली. त्यांना विवाहेच्छुकांचे विवाह लावता आले नाहीत. तर ज्येष्ठमध्ये मोठ्या मुलाचे व मोठ्या मुलाचे विवाह लावले जात नाहीत. आता आषाढमधील उर्वरित मुहूर्तावर हे विवाह होत आहेत. (latest marathi news)

उरलेत केवळ आठ मुहूर्त

गेल्या वर्षभरात एकसष्ट विवाह मुहूर्त होते. आता केवळ आठच विवाह मुहूर्त शेष आहेत.

जून : २३, २४, २९, ३०

जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५

शेवटचा मुहूर्त १५ जुलैला

खानदेशात कार्तिकी एकादशी अर्थात तुलसी विवाहापासून सुरु झालेले विवाह आषाढी एकादशीपर्यंत चालतात. त्यानंतर चार महिने विवाह ठप्प असतात. विवाहांची जुळवाजुळव सुरु असते. मात्र पारंपारिकतेनुसार विवाह लावले जात नाहीत. तेव्हा जुळलेले विवाह पंधरा जुलैपर्यंत लावण्यासाठी विवाहेच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Security Breach: एक्सप्रेस ट्रेनमध्ये धक्कादायक प्रसंग! इंजिनमध्ये बोगस लोको पायलट रंगेहात पकडला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा; तर सरकाला श्वास घेणेही घेणे अवघड होईल, आमदार रोहित पवार....

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT