Rushikesh Reddy, Dhananjay Patil and the action team were present during the inspection of the thieves and the items in custody at Deopur police station. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : सराईत चोरट्यांना ‘मिनी मोक्का’; धुळ्यातील देवपूर पोलिसांकडून राज्यातील पहिली कारवाई

Dhule News : राज्यात येथील देवपूर पोलिस ठाण्याकडून दोन सराईत चोरट्यांवर मिनी मोक्कांतर्गत पहिलीच कारवाई झाली. देवपूरचे पोलिस शोधपथक, तपासी अंमलदारांनी ही कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्यात येथील देवपूर पोलिस ठाण्याकडून दोन सराईत चोरट्यांवर मिनी मोक्कांतर्गत पहिलीच कारवाई झाली. देवपूरचे पोलिस शोधपथक, तपासी अंमलदारांनी ही कारवाई केली. सुधारित कलमान्वये संघटित गुन्हे करणाऱ्या दोघा चोरट्यांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून वीजमोटार व बॅटरी, असा आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अशा किरकोळ संघटित गुन्हेगारीत सरासरी एक ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेचे प्रयोजन आहे. देवपूरमधील तुषार रघुनाथ वाळके यांच्या घराच्या कंपाउंडमधून चोरट्याने २२ जुलैला रात्री पाण्याची वीजमोटार लंपास केली. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार विश्वनाथ शिरसाट तपास करीत होते.

तपासात शोधपथकाचे सहायक उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे यांना तौसिफ भिकन तांबोळी (वय २०, रा. मास्तरवाडी, देवपूर) व समीर ऊर्फ फारगेट रफिक पठाण (२४, रा. वीटाभट्टी, देवपूर) हे संशयित एक बॅटरी संशयास्पद पद्धतीने नेताना दिसले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खक्या दाखविल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. (latest marathi news)

पोलिसांनी मोटार जप्त केली. तसेच त्यांच्याकडे मिळालेल्या बॅटरीबाबत चौकशी केली असता दोघांनी ती २३ जुलैला रात्री दत्तमंदिर चौकातील (राजेश्वर कॉलनी) मोकळ्या जागेत अ‍ॅपेरिक्षातून (एमएच ०२ वायए २६३०) चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून वीजमोटार व बॅटरी, असा एकूण आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

१ जुलैपासून लागू नवीन कायद्यान्वये राज्यात देवपूर पोलिस ठाण्याकडून प्रथमच ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूरचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, उपनिरीक्षक राजेश इंदवे, सहाय्यक उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, श्री. आखाडे, हवालदार विश्वनाथ शिरसाट, रामकृष्ण माळी, राहुल गुजाळ, सौरभ कुटे, भटेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Donation Scam : चंपत राय यांचा ड्रायव्हर 'टिन्नू' आणि सुभाष करायचे रोकड पार! राम मंदिर देणगी चोरीची 'मोडस ऑपेरंडी' उघड!

Central Railway: मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा; मिरजमार्गे धावणाऱ्या चार गाड्या तात्पुरत्या रद्द; प्रवाशांची हाेणार गैरसोय

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

SCROLL FOR NEXT