Yuva Sena (Ubatha) office bearers, students protesting at Uttar Maharashtra University, poetess Bahinabai Choudhary, for the demand of paper examination of various faculties, stop the question of fee collection. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: पेपर तपासणीत गलथान कारभार कायम! युवासेनेसह विद्यार्थ्यांचा आरोप; विद्यापीठावर मोर्चा, कारभार सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन

Dhule News : विद्यार्थ्यांच्या तक्रारी उपकुलगुरूंकडे मांडल्या व परीक्षेच्या निकालात होणारा गोंधळ सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून घेतलेल्या विविध विद्याशाखांच्या निकालात यंदाही गलथान कारभार कायम राहिला, असा आरोप करत युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विद्यार्थ्यांसह जळगाव येथे विद्यापीठावर मोर्चा नेला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी उपकुलगुरूंकडे मांडल्या व परीक्षेच्या निकालात होणारा गोंधळ सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. (Dhule Mistakes in paper inspection continue Accusation of students Yuva Sena)

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून दर वर्षी परीक्षांच्या निकालात परीक्षा विभागाचा गलथान कारभार वारंवार समोर येतो. यंदाही तो कायम राहिला. याबाबत विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त झाल्याचे युवासेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांनी म्हटले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना पेपर न तपासता गुण दिल्याचा धक्कादायक प्रकारदेखील समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना प्रत्येक उत्तराला सरासरी सारखेच गुण देऊन पेपर तपासणी झाल्याचाही प्रकार आहे. यासोबतच ज्या विषयाचा पेपर तपासला जाणार आहे त्याऐवजी दुसऱ्या विषयाच्या पेपरचे नाव त्या उत्तरपत्रिकेवर टाकून तो तपासून निकाल दिल्याचा प्रकारही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्याचे ॲड. गोरे यांनी म्हटले आहे.

ज्या विषयात उत्तीर्ण होण्याचा विद्यार्थ्यांना विश्‍वास आहे, त्याच विषयात त्यांना नापास केले जाते. चॅलेंज केल्यानंतर ते विद्यार्थी उत्तीर्ण होऊनदेखील त्यांना भरलेले शुल्क परत केले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कुठलीही कारवाई विद्यापीठाकडून केली जात नाही.

शुल्क अन्यायकारक

सोबतच एमबीएच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी ५१० रुपये शुल्क आकारले जात असून, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करण्यासाठी एक हजार रुपये विद्यापीठाकडून शुल्क घेतले जात आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना २४० रुपये फोटोकॉपीसाठी, ५०६ रुपये चॅलेंज करण्यासाठी, तर व्हेरिफिकेशनसाठी ११० रुपये मोजावे लागत आहेत. विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे हे शुल्क पाहता हे विद्यापीठ आहे की उद्योगपीठ, असा सवाल युवासेनेने केला. (latest marathi news)

बीएस्सी विद्यार्थ्यांचा प्रश्‍न

बीएस्सी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन किंवा ८+ विषयांची एटीकेटी करावी. यंदा एसवीय बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना सरासरी सात ते आठ विषयांत नापास करण्यात आले आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना सर्व विषयांना चॅलेंज करायचे असूनदेखील विद्यापीठाच्या चुकीच्या अटींमुळे ते करता येत नाही.

कारण दोन विषयांनाच चॅलेंज करण्याची अट विद्यापीठाने टाकून ठेवली आहे. त्यासाठी हजारो रुपये फी आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालविली आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योग्य निर्णय घेऊन त्यांना कॅरीऑन किंवा ८+ विषयांची एटीकेटी लागू करावी, अशी मागणीही युवासेनेने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT