Speaking at the review meeting of 85 village water grid scheme in Shindkheda taluka, MLA Jayakumar Rawal. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘वॉटर ग्रिड’चे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा : आमदार जयकुमार रावल

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त ८५ गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या ८५ गाव वॉटर ग्रिड योजनेचे काम प्रगतिपथावर असून, या कामाचा आढावा रविवारी (ता. २५) आमदार रावल यांनी दोंडाईचा पालिकेच्या सभागृहात घेतला.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शिंदखेडा तालुक्यात ८५ गावे टंचाईग्रस्त आहेत. या टंचाईग्रस्त गावांची पिण्याची पाण्याची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिडच्या धर्तीवर ८५ गाव वॉटर ग्रिड योजना महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे गतीने काम सुरू आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने संबंधित गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदारांनी ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिल्या. (Dhule MLA Jaykumar Rawal work of Water Grid marathi news)

शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त ८५ गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या ८५ गाव वॉटर ग्रिड योजनेचे काम प्रगतिपथावर असून, या कामाचा आढावा रविवारी (ता. २५) आमदार रावल यांनी दोंडाईचा पालिकेच्या सभागृहात घेतला.

जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते कामराज निकम, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उपविभागीय अभियंता एस. एन. वानखेडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक बागल, जिल्हा परिषद सदस्य डी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंटी बागूल, होळ,

रामी, मेथी, विखरण, पथारे, झिरवे, जोगशेलू, सुराय, दलवाडे, विखुर्ले, खर्दे, मांडळ, वरुड, वाडी, अजंदे, कंचनपूर, वायपूर, आलाने, रामी, मेथी, होळ, साळवे, वरझडी, चिमठाणे, मांडळ आदी विविध गावांतील सरपंच, उपसरपंच व इतर प्रतिनिधी, शाखा अभियंता डी. ओ. पाटील, दीपक कोचर, प्रकल्प व्यवस्थापक विनीत भोजराज, प्रकल्प सल्लागार अमरजित कुमार आदी उपस्थित होते.

बैठकीत आमदार रावल म्हणाले, की शिंदखेडा तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी असलेला तालुका. परंतु हा डाग पुसण्याचे काम मी करत आहे. यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. यातील पिण्याच्या पाण्यासाठी टंचाईग्रस्त असलेल्या गावांना शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी तापी नदीवरून मोठ्या पाइपलाइनने पेडकाई मंदिर येथे जलशुद्धीकरण केंद्र बनवून तेथून तालुक्यातील ८५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

या योजनेचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. मात्र अजून गती देण्याची गरज आहे, जेणेकरून टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळेल. त्यामुळे निर्धारित वेळेत हे काम पूर्ण व्हावे, अशा सूचना त्यांनी अधिकारी, ठेकेदारांना दिल्या.

थेट मंत्र्यांना फोन अन्...

या योजनेचे काम सुरू असताना गावागावांत या पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी गावांतर्गत काँक्रिटीकरण तोडले जात आहे. त्यामुळे विद्रूपीकरण होत असल्याच्या तक्रारी सरपंच, पदाधिकाऱ्यांनी आमदार रावल यांच्याकडे केल्या. संबंधित रस्ते पूर्ववत करण्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद योजनेत नाही.

यावर आमदार रावल यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांना थेट बैठकीतून फोन करत याबाबत मागणी केली. त्यावर मंत्री श्री. पाटील यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करा, निधी मंजूर करतो, असे आश्वासन आमदार रावल यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT